Achira News Logo
Achira News

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा इतिहास, केरळमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय

Lokmat
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा इतिहास, केरळमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय
Full News
Share:

चेन्नई - ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांच्या गडाला भेदत इतिहास रचला आहे. केरळमध्येकाँग्रेसनेतृत्वातील आघाडीने सत्ता काबीज केली आहे. आसाम, पुदुचेरी येथे भाजपाने सत्ता राखली तर दुसरीकडेतामिळनाडूतअभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले.थलापती विजययांच्या पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी बहुमतापासून टीवीके १० जागा दूर आहेत. त्यातच विजय यांचे वडील चंद्रशेखर यांनीकाँग्रेसलासत्तेची ऑफर दिली आहे. निकालानंतर विजय यांचे वडील एस चंद्रशेखर यांनी माध्यमांना सांगितले की, काँग्रेसचा एक इतिहास आणि परंपरा आहे. काँग्रेस कमकुवत का होतेय, त्याचे कारण म्हणजे सत्तेचा अभाव. दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन काँग्रेस आणखी कमकुवत होतेय. ती सत्ता आम्ही काँग्रेसला देऊ. विजय देण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ती सत्ता मिळत असेल तर काँग्रेस त्यांचा इतिहास आणि वारसा वाचवू शकते. या संधीचा त्यांनी वापर करायला हवा अशी ऑफरच त्यांनी दिली. काय आहे सत्तेचे समीकरण? तामिळनाडूविधानसभेचे निकाल लागलेत. त्यात टीवीके सर्वात मोठा पक्ष बनला आहे परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या बहुमतापासून विजय यांचा पक्ष दूर आहे. टीवीकेला १०८ जागा मिळाल्या आहेत मात्र बहुमतासाठी लागणारा ११८ आकडा गाठायला विजय यांना आणखी एका पक्षाची गरज भासत आहे. डीएमकेसोबत ते सत्तेत जाणार नाहीत कारण त्यांच्याविरोधात रागाचा वापर करून टीवीके सत्तेकडे वाटचाल करत होता. विजय यांच्या वडिलांना काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. सध्याचे नंबर पाहिले तर तामिळनाडूत डिएमकेजवळ ५९ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. जर काँग्रेस टीवीकेसोबत आली तर हा आकडा ११३ पर्यंत पोहचतो. त्यानंतर बहुमतासाठी ५ जागांची गरज लागेल. त्यात पीएमके, आययूएलसारख्या पक्षांसोबत चर्चा होऊ शकते. ज्यांच्याकडे प्रत्येकी ४ आणि २ जागा आहेत. काँग्रेसचं तामिळनाडूत अस्तित्व काय? तामिळनाडूच्या डिएमके सरकारमध्ये काँग्रेसचा कुठलाही आमदार मंत्री नव्हता. डिएमके काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा भाग असला तरी ते सरकारमध्ये सहभागी नव्हते. आता जर काँग्रेस टीवीकेसोबत गेल्यास सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससाठी ही संजीवनी ठरेल. मात्र स्टॅलिन यांच्यासोबत आघाडी धर्म पाळायचा की टीवीकेसोबत जात सत्तेतून पक्ष वाढवायचा याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा इतिहास, केरळमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय | Achira News