Physicswallah Income Tax Notice: एडटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'फिजिक्सवाला' समोर आयकर विभागानं मोठं संकट उभं केलंय. असेसमेंट ईयर २०२३-२४ साठी आयकर विभागानं कंपनीला एकूण २६३.३४ कोटी रुपयांचीइन्कम टॅक्सडिमांड नोटीस (Income Tax Demand Notice) बजावली आहे. ही नोटीस प्रामुख्याने त्या गुंतवणुकीवर आधारित आहे जी कंपनीने संबंधित कालावधीत गुंतवणूकदारांकडून जमा केली होती. यामध्ये सेबी अंतर्गत नोंदणीकृत कॅटेगरी-II अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स (AIF) कडून मिळालेल्या निधीचाही समावेश आहे, ज्याला विभागानं आता कंपनीचे 'करपात्र उत्पन्न' मानलं आहे. फिजिक्सवालानं एका रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये या नोटीसची माहिती दिली असून, या असेसमेंट ऑर्डरला वरिष्ठ अपीलीय प्राधिकरणासमोर आव्हान देण्याची योजना असल्याचं स्पष्ट केलंय. कंपनीच्या मते, या नोटिशीविरुद्ध अपील करण्यासाठी त्यांच्याकडे भक्कम कायदेशीर आणि तथ्यात्मक आधार आहेत. सध्या नफ्यात चालणाऱ्या मोजक्या एडटेक कंपन्यांपैकी फिजिक्सवाला एक आहे, परंतु ही मोठी कर मागणी कंपनीच्या आर्थिक संतुलनासाठी नवीन आव्हान ठरू शकते. कर नोटिशीच्या संकटानंतरही, फिजिक्सवालाचे अलीकडील आर्थिक निकाल अत्यंत मजबूत राहिले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ३३ टक्क्यांनी वाढून १०२.२७ कोटी रुपयांवर पोहोचलाय. कंपनीच्या ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या महसुलातही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा महसूल ८०९.६७ कोटी रुपये होता, जो आता वाढून १,०८२.४१ कोटी रुपये झालाय. बाजारातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, बुधवारी बीएसई (BSE) वर कंपनीचे शेअर्स ७.८७ टक्क्यांच्या जोरदार वाढीसह ८६.८१ रुपयांवर बंद झाले. मात्र, टॅक्स नोटिशीशी संबंधित ही माहिती बाजार बंद झाल्यानंतर देण्यात आली आहे, त्यामुळे आता गुंतवणूकदारांचे लक्ष पुढच्या व्यवहाराच्या दिवसावर असेल. सध्या कंपनीचं पूर्ण लक्ष आयकर विभागाच्या २६३.३४ कोटी रुपयांच्या दाव्याला कायदेशीर आव्हान देण्यावर आणि आपल्या विकासाचा वेग कायम राखण्यावर आहे. (टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
फिजिक्सवाला यांना 263 कोटी रुपयांच्या प्राप्तीकर मागणीची नोटीस मिळाली
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.