म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरात चर्चेत राहिलेल्या चौसाळा, कन्नड प्रकरणातील ५०१ मुलाचे निकाल राखीव ठेवले आहेत. सामुदायिक कॉपी प्रकरणात कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील १३० तर बीड जिल्ह्यातील चौसाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील ३७१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासणीत हस्ताक्षर बदल, पान फाडले अशी ४१ प्रकरणे समोर आली. त्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला नाही.बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला बीड तालुक्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्राच्या आवारात व वर्गाच्या खिडक्यांच्या असापास लोकांची गर्दी केली असल्याचे ड्रोनने टिपलेले चित्रीकरण राज्यभर गाजले. यानंतर शिक्षण विभागाने गैरप्रकाराची पडताळणी केली असता वर्गामध्ये मास कॉपी करत असल्याचे व त्यांना पर्यवेक्षक, केंद्रसंचालक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचे समोर आले होते. मंडळाने आज जाहीर केलेल्या निकालात या परीक्षा केंद्रावर पेपर देणाऱ्या सर्व ३७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहे.तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयाला शिक्षणाधिकाऱ्यांनी इंग्रजी विषयाच्या पेपरला पहिल्याच दिवशी भेट दिली तेव्हा सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला होता. यानंतर मंडळाने समिती नेमत चौकशी केली. यानंतर या केंद्रावरील १३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मंडळ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. विभागात पाच जिल्ह्यात ४८ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मास कॉपीसह इतर प्रकरणात एकूण ५४४ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. मास कॉपी प्रकरणात पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मागील काही वर्षातील पहिलीच मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते.बारावी परीक्षेत कोणाचे वर्चस्व? ९६.४४ टक्क्यांसह 'या' शाखेने मारली बाजी; पाहा पूर्ण निकाल आकडेवारीहस्ताक्षरात बदल..!राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षणसह, महसूल, पोलिस विभागाने विविध खबरदारी घेतली. परंतु, विभागात यानंतरही कॉपी झाल्याचे समोर आले. यासह उत्तरपत्रिका तपासणीत अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरामध्ये बदल तर काहींची उत्तरपत्रिकेची पाने गहाळ असल्याकारणामुळे विभागात ४१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला. परीक्षक, नियामकांनी निदर्शनास आणून दिलेली ही प्रकरणे असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
फसवणूक प्रकरणामुळे महाराष्ट्रातील शाळांना धक्का, 501 विद्यार्थ्यांसाठी निकाल राखीव
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.