तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. BSNL सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या लाखो युजर्सना दोन जबरदस्त वार्षिक प्रीपेड प्लॅन देत आहे. या प्लॅनमध्ये बेसिक बेनिफिट्ससह लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी मिळत आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये वर्षभर सेवा दिली जाते, ज्यामुळे ज्यांना कमी पैशात दररोज डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज SMS हवा आहे त्यांच्यासाठी ते सर्वोत्तम पर्याय आहेत. यापैकी एक प्लॅन संतुलित वापरावर लक्ष केंद्रित करते, तर दुसरी अशा युजर्ससाठी आहे ज्यांना दररोज अधिक डेटाची आवश्यकता आहे. या दोन प्लॅनबद्दल विस्ताराने जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया.BSNL चा 2,626 रुपयांचा वार्षिक प्लॅनBSNL ने काही काळापूर्वी हा प्लॅन सादर केला आहे. या फोनची वैधता 365 दिवसांची असून त्याची किंमत 2,626 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.6 GB हाय-स्पीड डेटा मिळतो, जो वेब ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया ब्राउझिंग आणि ऑनलाइन चॅटिंग यासारख्या वापरासाठी पुरेसा आहे.डेटा बेनिफिट्स व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये भारतातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस ऍक्सेस देखील दिले जाते. यासह,युजर्स कोणत्याही अतिरिक्तशुल्काशिवाय कॉल करण्यास सक्षम असतील, मग ते लोकल कॉल असो किंवा राष्ट्रीय कॉल. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधता कालावधीत दररोज 100 SMS देखील दिले जातात.BSNL चा 2,799 रुपयांचा वार्षिक प्लॅनBSNL च्या या प्लॅनची किंमत 2,799 रुपयांपासून सुरू होते जिथे तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 3 GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. यासर्व गोष्टी लक्षात घेऊनअसे म्हणता येईल की, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे.लक्षात घ्या की BSNL चा 2,626 रुपयांचा प्लॅन केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत रिचार्ज केला जाऊ शकतो. तर, 2,799 रुपयांचा प्लॅन किती काळ लाइव्ह आहे याची कोणतीही माहिती नाही.BSNL च्या 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळत आहे. या BSNL च्या या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. यात प्लॅनमध्ये केवळ 50MB हाय-स्पीड 4G डेटा मिळतो आणि त्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत जातो. BSNL चा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी नाही, असे म्हणणे योग्य ठरेल.
बी. एस. एन. एल. ने दीर्घकालीन वैधता असलेल्या वापरकर्त्यांसाठी दोन वार्षिक प्रीपेड योजना सादर केल्या
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.