Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरात टास्कदरम्यान भांडणे होताना दिसतात. अनेकदा स्पर्धक एकमेकांच्या अंगावरही धावून जातात. काही वेळा अपशब्दांचा वापर होतो. तर काही वेळा एकमेकांचा अपमान केला जातो. मात्र या सगळ्यात टास्क गमतीशीर पद्धतीने खेळला गेला तर? सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा होताना दिसत आहे. स्पर्धकांच्या खेळावर प्रेक्षकांसह कलाकारांच्या प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यात झालेल्या वादानंतर अनेकजण तन्वीच्या खेळाबद्दल बोलताना दिसत आहेत. आता या सगळ्यात बिग बॉस मराठीचा असा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जो सर्वांना खळखळून हसवताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पहिला कॅप्टन कोण होणार, अशी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या कॅप्टन्सीसाठी घरात बी बी फार्म हा टास्क सुरू आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये टास्क सुरू असल्याचे दिसते. या प्रोमोमध्ये प्रभू शेळके आणि राकेश बापट लक्ष वेधून घेत आहे. प्रभू आणि राकेश यांच्यात चुरस दिसून येत आहे. तसेच प्रभू राकेशला सापडत नसल्याचे दिसत आहे. तो प्रभूच्या मागे पळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यांच्यात वादावादी, भांडणे दिसत नसून ते हसत असल्याचे दिसत आहेत. इतकेच नाही तर घरातील इतर स्पर्धकही हसत असल्याचेदेखील दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “टास्कमध्ये छोट्या डॉनने पळवलं राकेशच्या तोंडचं पाणी”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर अनेकांनी असे लिहिले आहे की विनाकारण भांडण्यापेक्षा हे छान आहे. तर काहींनी प्रभू आणि राकेशचे कौतुक केले आहे. आता हा टास्क कोण जिंकणार, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पहिला कॅप्टन कोण बनणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच बिग बॉसच्या या पर्वातील समीकरणे कशी बदलणार, नेमकं काय घडणार, कोणते स्पर्धक कोणाचे मित्र होणार आणि कोणामध्ये शत्रुत्व निर्माण होणार, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकांची शाळा घेणार, नेमकं काय पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
बिग बॉस मराठी 6: स्पर्धकांनी घराच्या मर्यादेत तणावपूर्ण कामांमध्ये भाग घेतला
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.