Achira News Logo
Achira News

बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

Lokmat
बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी
Full News
Share:

कोलकाता : प. बंगालमध्ये राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ५० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यावरून मुख्यमंत्रीममता बॅनर्जीयांनी उच्च स्तरावरून होत असलेला हा राजकीय हस्तक्षेप असल्याची टीका केली. कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी इच्छुक -पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास बहरामपूरमधून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. सुवेंदूंचा प्रचारास प्रारंभविरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी दक्षिण कोलकातामधील अत्यंत चुरशीच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या जागेवर त्यांची लढत मुख्यमंत्रीममता बॅनर्जीयांच्याशी होत आहे. त्यांनी येथे एक सभाही घेतली. भाजपची दुसरी यादी जाहीरभाजपने राज्य विधानसभेसाठी १११ उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली. यात महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री रूपा गांगुली यांच्या नावाचा समावेश आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या लहान बंधूंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात अत्याचार व हत्या झालेल्या पीडितेच्या मातेने भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २४-परगणा जिल्ह्यात पनिवाटी मतदारसंघातून त्यांना तिकीट दिले जाऊ शकते. हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी | Achira News