Gold Silver Rate :जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्यादरांचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी सोन्याने १ लाख ६० हजार रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला, तरचांदीच्यादरात ६ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. लग्नसराईच्या काळात दागिन्यांचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. MCX वर ऐतिहासिक उच्चांकमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्या-चांदीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने एप्रिल वायदा सोने ४ टक्क्यांहून अधिक वधारून १,६०,७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर मार्च वायदा चांदी ६ टक्क्यांच्या जोरदार उसळीसह २,८४,०९४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारपेठेचा प्रभावआंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्डचे दर २.२ टक्क्यांनी वधारून ५,०४४.७४ डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा नरम कल आणि येन वगळता इतर चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यानेगुंतवणूकदारांनीसुरक्षितगुंतवणूकम्हणून सोन्याला पसंती दिली आहे. महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील दर (प्रति १० ग्रॅम)गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत,| शहर | २४ कॅरेट सोने (₹) | २२ कॅरेट सोने (₹) || मुंबई/पुणे | १,६०,५३० | १,४७,१५० || चेन्नई | १,६२,५६० | १,४९,००० || दिल्ली | १,६०,६८० | १,४७,३०० || कोलकाता | १,६०,५३० | १,४७,१५० || बंगळुरू | १,६०,५३० | १,४७,१५० || अहमदाबाद | १,६०,५८० | १,४७,२०० | तेजीची प्रमुख कारणे वाचा -वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.