Achira News Logo
Achira News

बनावट चलन आणि बॉम्बच्या धमक्या-अहमदाबाद आणि मुंबईची अद्ययावत माहिती

Lokmat
बनावट चलन आणि बॉम्बच्या धमक्या-अहमदाबाद आणि मुंबईची अद्ययावत माहिती
Full News
Share:

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स... LIVE अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे दोन कोटी रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा सापडल्या. या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जात असून, पोलिसांनी आरोपी वापरत असलेली कारही जप्त केली आहे, असे सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले. #WATCH| Ahmedabad, Gujarat | Crime Branch has arrested six people, including a woman, with counterfeit currency of a face value of Rs 2 crore. The car used by the accused has been seized by Crime Branch Ahmedabad Citypic.twitter.com/td9uyYwKCb बुधवारी महाराष्ट्रातील मुंबईच्या बीकेसी येथील पासपोर्ट कार्यालयात बॉम्बची धमकी मिळाली. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती, ज्यात पासपोर्ट कार्यालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइड भरलेले १९ बॉम्ब ठेवल्याचा आणि आज दुपारी १:३० वाजता त्यांचा स्फोट होईल, असा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने परिसर रिकामा करून शोध घेतला, परंतु काहीही आढळले नाही, ज्यामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या ईमेलमधून धमकी पाठवण्यात आली होती, त्या ईमेलचा तपशील आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. उत्तर प्रदेशातीलमहाराजगंज जिल्ह्यातीलभाजपाकार्यालयात एकच खळबळ उडाली. एका महिलेने एका पदाधिकाऱ्याला चोप दिला. स्वागत समारंभाच्या दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित असलेले कार्यकर्तेही अवाक झाले. बघता बघता कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.वाचा सविस्तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक राहिलेल्या जोसेफ केंट यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. जोसेफ केंट यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता बोलताना त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका-इस्रायलच्या ऑपरेशनमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई मारले गेले. हीच ती गोष्ट होती जी आम्ही सगळ्यात शेवटी करायला हवी होती. जेव्हा तुम्ही त्यांना हटवता किंवा हल्ला करून मारून टाकता. असे केल्याने लोक, सरकार आणि पुढचे सर्वोच्च नेते हे एकजूट होतील. मला वाटते की आमच्याजवळ जी माहिती आहे, त्यानुसार मोजतबा खामेनेई यांच्याबाबतीत तेच होत आहे', असे केंट म्हणाले आहेत. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षामुळे राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी गुढीपाडव्या निमित्ताने शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव, डोंबिवली, पुण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रामध्ये देखावे सादर करण्यात आले. मराठी कलाकार, राजकीय नेतेही या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर हे सहभागी झाले. #WATCH| Nagpur: Maharashtra: Marathi actress Sai Tamhankar also joined the Gudi Padwa festivities alongside Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis.https://t.co/GtlmCsauDMpic.twitter.com/AP2CdAAeUx

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बनावट चलन आणि बॉम्बच्या धमक्या-अहमदाबाद आणि मुंबईची अद्ययावत माहिती | Achira News