- योगेश पांडेनागपूर- ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येतील शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनाअटककेली आहे. नागपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यांना वर्धा येथूनअटककरण्यात आली असून हे प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची चर्चा करणाऱ्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात यवतमाळचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांची सुरुवातीला चौकशीदेखील झाली होती व त्यांना अटकपूर्व जामीनदेखील मिळाला होता. काटोलकर हे अगोदर भंडारा येथे कार्यरत होते. २४ डिसेंबर २०२१ ला ते नागपुरात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. २० मार्च २०२२ पर्यंत ते जिल्हा परिषदेत असताना त्यांना अनेक शिक्षण व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची माहिती होती. परंतु वेतन संबंधात शाळेकडून आलेल्या प्रस्तावाची कुठलीही शहानिशा न करता त्यांचे थकीत वेतन देण्याची प्रक्रिया राबविली. त्यातून त्यांनी शासनाची १२ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. नागपुरातून त्यांची यवतमाळला बदली झाली. त्यांचे राहणे वर्धा येथे होते. मंगळवारी पोलिसांच्या पथकाने तेथून काटोलकरांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालायासमोर हजर करण्यात आले व २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २७ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक यांच्यासह सहायक शिक्षक, सहा लिपीक व कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे.
बनावट शालार्थ आयडी तयार केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला अटक
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.