आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहचा फॉर्ममुंबई इंडियन्ससाठीचिंतेचा विषय राहिला आहे. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या वानखेडेच्या मैदानातील सामन्यात बुमराहची पाटी पुन्हा कोरीच राहिली. या सामन्यात हिम्मत सिंगच्या रुपात त्याने एक विकेट खात्यात जमा केली. पण तोच चेंडू नो बॉल ठरला अन् त्याच्या विकेटचा आनंद सायनरसोबत क्षणात नाहीसा झाला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! नो बॉलमुळे बुमराह विकेटलेस राहिला, गावसकरांनीही झापलं 🔴 SUNIL GAVASKAR CRITICISE BUMRAH’S NO BALL 🤯🎙️ - “this is not acceptable, you are a professional cricketer, wide, I can understand but bowling no-ball, it’s clearly not acceptable” [Sky Sports]pic.twitter.com/qCWsgM556B लखनौच्या डावातील १४ व्या षटकात तिसरा चेंडू नो बॉल टाकल्यावर त्याने एक वाइड चेंडू टाकल्यावर पुन्हा नो बॉल टाकला. यावर सामन्यादरम्यान समोलचन करणाऱ्या लिटल मास्टरसुनील गावसकरांनीहीदिग्गज गोलंदाजाला झापल्याचे पाहायला मिळाले. एकवेळ वाइड बॉल समजू शकतो, पण त्याच्याकडून ओव्हर स्टेप नो बॉल अपेक्षित नाही, अशा शब्दांत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण... नेमकं काय म्हणाले गावसकर? जसप्रीत बुमराहनं एकाच षटकात दोन नो बॉल टाकल्यावर गावसकरांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "हे अजिबात स्वीकारार्ह नाही. तू एक प्रोफेशनल क्रिकेटर आहेस. वाइड समजू शकतो, पण नो-बॉल टाकणं हे अजिबात पटण्याजोगे नाही." जसप्रीत बुमराहनं या सामन्यातील ३ बॉलसह यंदाच्या हंगामात ७ नो बॉल टाकले आहेत. क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजाची ही कामगिरी खटकणारी अशीच आहे. बुमराहसाठी खराब हंगाम, पुन्हा विकेटची पाटी राहिली कोरी यंदाचा हंगामातमुंबई इंडियन्ससहजसप्रीत बुमराहसाठी भयावह स्वप्नासारखाच राहिला आहे. पहिल्या पाच सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पहिल्या ९ सामन्यात त्याने ३३ षटकात २८४ धावा खर्च करत फक्त ३ विकेट्स घेतल्या. लखनौ विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ४५ धावा देत तो पुन्हा विकेटलेस राहिला.
बुमराच्या नो-बॉल आणि वाईड बॉल्सने मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा आयपीएल सामना खराब केला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.