पुणे:स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीअशोक खरातयाच्याशी संबंधित प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून,सुषमा अंधारेयांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले. अंधारे यांनी दावा केला की, आरोपीअशोक खरातयांच्या ट्रस्टशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा संबंध असल्याचे पुरावे त्यांच्या हाती आहेत.माध्यमांशी बोलतानासुषमा अंधारेयांनी खालील मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली, रूपाली चाकणकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी. दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करावी चौकशीपूर्वी चाकणकर यांना पदावरून बाजूला करावे.. त्या फरार होण्यापूर्वी कारवाई व्हावी त्या पुढे म्हणाल्या, चाकणकर आणि खरात यांचे CDR (Call Detail Records) तपासावेत. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीनेही तपास करावा दोघांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासावेत, विशेषतः खरात यांची देश-विदेशातील मालमत्तेची चौकशी व्हावी.पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना अंधारे यांनी आरोपही केला की,रूपाली चाकणकर या त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून तपासावर परिणाम करू शकतात. तसेच, त्या सध्या कुठे आहेत याबाबतही शंका उपस्थित करत त्यांनी त्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, याची चौकशी करण्याची मागणी केली. अंधारे यांनी स्पष्ट केले की,या प्रकरणात कुणीही दोषी असेल, तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई व्हावी. त्यांनी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची नावे घेतली, मात्र त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचेही सांगितले.
बलात्कार प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी अशोक खरातियावर गंभीर आरोप केले आहेत.
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.