Achira News Logo
Achira News

बॉलीवूड स्टार गोविंदाची भाची आरती सिंग पुन्हा एकदा चर्चेत

Lokmat
बॉलीवूड स्टार गोविंदाची भाची आरती सिंग पुन्हा एकदा चर्चेत
Full News
Share:

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरती आपल्या बोल्ड फोटोना घेऊन नेहमीच चर्चेत असते. आरतीचा फोटोंमधील अंदाज देखील तिच्या चाहत्यांना आवडत असतो. अलीकडेच आरतीने बिकिनीमधील काही फोटो शेअर केले. पण, यावेळी तिच्या काही फोटोंमुळे ती ट्रोलिंगचा शिकार झाली. आरती सिंहने बिझनेसमन दीपक चौहानसोबतचे थायलंड व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आरतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीला तिने हे फोटो डिलीट केले, पण काही वेळानंतर तिने पुन्हा पिंक बिकिनीतील फोटो शेअर करत ठाम भूमिका मांडली. आरतीने लिहिलं, "माझं आयुष्य, माझे नियम. माझं शरीर आणि माझे कपडे ही माझी स्वतःची निवड आहे. आपण नेहमी विचार करत बसतो की लोक काय म्हणतील. पण एक दिवस असं वाटतं की, जे मनाला हवं होतं तेच करायला हवं होतं. ज्या लोकांबद्दल आपण विचार करतो, ते आपल्याला ओळखतही नाहीत". आरतीने पुढे सांगितलं की, मागील वेळी बिकिनी फोटो पोस्ट केल्यानंतर काही लोकांनी तिला अनफॉलो केलं होतं, ज्याचा तिच्यावर परिणाम झाला आणि तिने फोटो डिलीट केले. मात्र, काही दिवसांनी तिची जवळची मैत्रीण शेफालीच्या निधनानंतर तिला आयुष्याची अनिश्चितता जाणवली. आरती म्हणाली, "आपण जे खरंच आपल्याला आनंद देतं तेच का करू नये? मी कुणाला दुखावत नाही. जर तुम्हाला आवडत नसेल, तर अनफॉलो करा. कमेंट्समधून फक्त तुमचे संस्कार दिसतात, माझ्या कपड्यांमधून नाही". दरम्यान आरती सिंह ही बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची भाची आहे. तिने २००७ साली मायका या मालिकेतून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बॉलीवूड स्टार गोविंदाची भाची आरती सिंग पुन्हा एकदा चर्चेत | Achira News