पाटणा: लग्न सोहळ्यातील विधी सुरु होते. मांडवात आनंदीआनंद होता. दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साह होता. पण एका नोटेनं नवरदेवाचं पितळ उघडं पडलं आणि अखेरच्या क्षणी लग्न मोडलं . पाठवणीच्या वेळी नवरदेवाचं बिंग फुटलं. यानंतर नवरदेवाला नवरीशिवाय घरी परतावं लागलं. यानंतर तिचा विवाह अन्य तरुणाशी झाला. ही चक्रावून टाकणारी घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे.बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या गावात हा प्रकार घडला. गावात मनियारी परिसरातून शुक्रवारी एक वरात आली होती. रात्रभर विवाह विधी चालले. लग्न सोहळा संपन्न झाला. मंडपात बसलेला नवरदेव वेगळाच आहे, याची कल्पना तोवर कोणालाच आलेली नव्हती. ज्या तरुणाशी विवाह निश्चित झाला होता, त्याच्या जागी वेगळाच तरुण नवरदेव म्हणून सर्व विधी करत होता.Indigo Flight Power Bank Fire: प्रवाशाच्या पॉवर बँकला आग, संपूर्ण विमानात धूर; एमर्जन्सी गेटनं प्रवाशांची थरारक सुटकाशनिवारी सकाळच्या सुमारास नवरीनं नवरदेवाची परीक्षा घेण्यासाठी त्याला २०० रुपयांची नोट दिली. ही कितीची नोट आहे, असा प्रश्न नवरीनं नवरदेवाला विचारला. त्यावर २००० रुपयांची नोट असल्याचं उत्तर नवरदेवानं दिलं. त्यामुळे सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नवरदेवाला २०० आणि २००० रुपयांच्या नोटांमधील फरक लक्षात न आल्यानं तिथे असलेल्या महिला वर्गानं गोंधळ घातला.Jabalpur Boat Accident: आईनं जीव सोडला, पण ती माऊली बाळाला सोडतच नव्हती! माय-लेकरांना बाहेर काढणारं बचाव पथक हळहळलंहळूहळू विषय तापत गेला. आमच्या सोबत विश्वासघात झाल्याचं म्हणत वधू पक्षानं नवरीची पाठवणी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिलाय लग्नात झालेल्या गोंधळाची माहिती बरियापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना समजावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण वर पक्षानं ऐकलं नाही. अखेर नवरदेवाला रिकाम्या हातानं परतावं लागलं. नवरीशिवाय वरात पसरली. पोलिसांनी वर पक्षातील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लग्नाच्या सोहळ्यादरम्यान वधूची बदली
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.