Arun Govil On Ranbir Kapoor : पडद्यावर प्रभू राम कसे दिसतात, याची एक ठरावीक प्रतिमा एका चेहऱ्यामुळे तयार झाली आहे ती अभिनेते अरुण गोविल यांच्यामुळे. आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत राहणारे अरुण गोविल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण ते पुन्हा ‘रामायण’मधून एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रामायण’ मालिकेत प्रभू रामाची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेले अरुण गोविल आता दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशातच नुकतंच त्यांनी या सिनेमाबद्दल आणि सिनेमातील कलाकारांबद्दल प्रतिक्रिया दिली. अभिनेते अरुण गोविल यांनी येणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. तसंच चित्रपटात रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरचंही त्यांनी कौतुक केलं. गोविल म्हणाले की, पडद्यावर देवाची भूमिका साकारण्यासाठी कलाकार चांगला अभिनेता असण्याबरोबरच एक चांगला माणूसही असला पाहिजे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अरुण गोविल म्हणाले, “नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ चित्रपट खूप छान आहे. हा चित्रपट दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन बनवला आहे.रणबीर कपूरप्रभू रामाच्या भूमिकेत खूपच छान दिसत आहे. तो चांगला अभिनेता आहे आणि चांगला माणूसही आहे. देवाची भूमिका करायची असेल तर मन शुद्ध असायला हवं आणि माणूस म्हणूनही चांगलं असणं गरजेचं आहे.” सोशल मीडियावर रामाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणबीर कपूर यांच्या लूकची तुलना १९८० च्या दशकातील गोविल यांच्या भूमिकेशी मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर अरुण गोविल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा एक दर्जा निर्माण होतो, तेव्हा तुलना होतेच. त्याबद्दल कुणीही वाईट वाटून घेऊ नये. देवाची भूमिका करताना कलाकाराचा लूक खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला पाहिल्यावर लोकांना ‘देव असेच दिसू शकतात’ असे वाटले पाहिजे.” A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra) मात्र, त्यांनी येणाऱ्या रामायण चित्रपटाची २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी तुलना करण्यास स्पष्ट नकार दिला. “‘रामायण’ आणि ‘आदिपुरुष’ यामध्ये खूप फरक आहे”, असं ते स्पष्टपणे म्हणाले. दरम्यान, ‘रामायण’बद्दल सांगायचं झाल्यास, यात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रामायण’ सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. यापैकी पहिला भाग येत्या दिवाळीट प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग पुढच्या वर्षीच्या दिवाळीत रिलीज होईल.
भगवान रामाच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे अरुण गोविल यांनी केले कौतुक
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.