मुंबई -बंगालच्या राजकारणात निवडणुकीच्या निकालांसोबत जर आणखी कशाची चर्चा होत असेल, तर ती आहे अनुपम खेर यांच्या 'केसांची'. भाजप नेत्याच्या एका वक्तव्यानं सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. यावर आता अनुपम खेर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलीये.बंगालच्या निवडणुकीत व्हायरल झालेल्या झालमुरीपासून ते सात्विक माशापर्यंत अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले. भाजपनंऐतिहासिक विजयहीमिळवला आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण मग, आणखी एक विनोदी दावा समोर आला असून त्यावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येणार नाही, असं म्हटलं. त्याचबरोबर सामिक यांनी अनुपम खेर यांच्या न वाढणाऱ्या केसांची शपथ घेतली. सामिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.Riteish Deshmukh : 'राजा शिवाजी सिनेमाचं बजेट दाखवलं जातंय ते खोटं'; बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाबद्दलबही स्पष्टच बोलला रितेश देशमुखकाय म्हणाले सामिक भट्टाचार्य?भाजप नेते म्हणाले, 'तृणमूल काँग्रेस नष्ट होणारच होती. बघा, आकाश पृथ्वीवर कोसळू शकतं, समुद्र आकाशात उसळू शकतो. अनुपम खेर यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवू शकतात. पण तृणमूल काँग्रेस सत्तेवर येईल ही कल्पना स्वप्नांच्या पलीकडची आहे.'Tharala Tar Mag Promo : याचसाठी केलेला अट्टाहास! सायलीनं खोट्या तन्वीला मारून-मारून केलं बेहाल, लवकरच 'ठरलं तर मग' मालिकेत होणार प्रियाचा पर्दाफाशअनुपम खेर यांचं भन्नाट उत्तरअनुपम खेरयांनीही हा व्हिडिओ पाहिला आणि सामिक यांचा व्हिडिओ शेअर करत गंमतीदार उत्तर दिलंय. अनुपम खेर यांनी म्हटलं की, 'अरे भावा. मी तुझं काय वाईट केलंय? तुला माझ्या डोक्यावर केस का उगवावेत असं वाटतंय? मी शंभर जन्मांतही यासाठी प्रार्थना करणार नाही. जय श्री राम!'अनुपम खेर यांच्या या पोस्टवर एका युजरने लिहिलं की, 'अनुपम सर विचार करत असतील, 'मुझे क्यू तोडा' काही नेटकरी म्हणाले, 'सर, तुम्ही खुश असायला हवं, कोणीतरी तुमच्या वाढणाऱ्या केसांबद्दल बोलत आहे.'मत व्यक्त करणे हा माझा मुलभूत अधिकार आहे: अनुपम खेरदरम्यान, अनुपम खेर अनेकदा विविध विषयांवर किंवा व्हायरलव्हिडिओंवरआपलं मत व्यक्त करतात. अनुपम यांच्या कामाबद्दल सांगायचं तर ते शेवटचे 'तन्वी द ग्रेट' या सिनेमात दिसले होते. या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलेलं. अनुपम खेर लवकरच 'खोसला का घोसला पार्ट २' आणि 'फ्लिकर'मध्ये दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होणार आहेत.
भाजप नेत्याच्या केस वाढवण्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात विनोदी वादाला तोंड फुटले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.