साताऱ्यात मकरंद पाटलांवर फिल्डिंग परभणीमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) आमदार राजेश विटेकर यांना सोबत घेऊन शिवसेनेला धक्का दिला. आता साताऱ्यातही शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याची रणनीती आखली आहे. साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना धक्का देण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे दोघे एकत्र येऊन भाजपाला सत्तेबाहेर ठेवतील अशी चर्चा जिल्ह्यात होती . पण, भाजपाने मकरंद पाटील यांना सोबत घेऊन सातारा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाच सदस्यांची गरज आहे. शिवसेनेचे दोन सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच मकरंद पाटील भाजपासोबत आल्यास भाजपा आणि राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होईल. परभणीप्रमाणे साताऱ्यातही राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यात भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखल्याने एकनाथ शिंदे कमालीचे नाराज असल्याचे समजते.
भाजपाचे अनपेक्षित पाऊलः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर परभणीसाठी मैदानात
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.