कोल्हापूर:कोल्हापूरच्यामहापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटीलयांनी पत्रकार परिषदेत केली. आजच दुपारी निकम या महापौरपदासाठी अर्ज भरतील. पाटील यांनी भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जयंत पाटील, राहूल चिकोडे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांच्या चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही घोषणा केली. पाटील म्हणाले, प्रदेशकडे आम्ही सहा नावे पाठवली होती. त्यातील रूपाराणी निकम या नावावर प्रदेशने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार त्या अर्ज भरतील. उपमहापौरपद हे शिंदेसेनेला देण्यात येणार आहे. परंतू त्यांच्यात आणि जनसुराज्यमध्ये काही चर्चा सुरू असेल तर ते त्यांचे नेते सांगतील. मंत्री हसन मुश्रीफ हे महापौरपदाची खांडोळी होवू नये असे म्हणत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हीच इच्छा आहे.उपमहापौरपदी अक्षय जरग उपमहापौरपदी जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी याबाबत रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
भाजपच्या रूपराणी संग्राम निकम यांची कोल्हापूरच्या महापौरपदी नियुक्ती
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.