मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली :‘प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणि राष्ट्रीय परिघावर भक्कम झालेले द्विध्रुवीय राजकारण’, पश्चिम बंगालमधील भाजपचा ऐतिहासिक विजय आणि अन्य चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे असे एका वाक्यात वर्णन करता येईल. हेच कल २०२९ च्या लोकसभा निवडणुकांतही कमी अधिक फरकाने कायम राहतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.भाजपची रणनीती यशस्वीपश्चिम बंगालच्यारणात देशाच्या राजकारणाचा पोत बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपसह संघपरिवाराने जाणीवपूर्वक रणनीती आखून तडीसही नेली, हिंदू मतांचे जबरदस्त ध्रुवीकरण मतपेटीत उमटेल याची बूथपातळीवरून भक्कम बांधबंदिस्ती केली, इतर राज्यांतील लाखो बंगाली मतदार मतदानासाठी येतीलच याची चोख व्यवस्था केली.संघटनात्मक परिश्रमांना SIR ची जोडनिवडणुकांत विजयच मिळवायचा असतो हे धोरण व त्याला साजेशी रणनीती करण्यात भाजपचा हात धरणारा एकही पक्ष त्यांच्या आसपासही सध्या नाही. बंगालमध्ये संघटनात्मक परिश्रमांच्या जोडीला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत लाखो लोकांची नावे मतपत्रिकांतून कापली गेली. तिथपासून निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा महापूर आला. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे भाजपने पश्चिम बंगाल नामक एक भक्कम गड यावेळी सहजासहजी सर केला.अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत महत्वाच्या प्रदेशांत एका पक्षाचे एकछत्री साम्राज्य, हे स्वातंत्र्यानंतरची जवळपास तीन दशके दिसणारे दृश्य पुन्हा दिसत असून त्यात महत्वाचा फरक इतकाच की हा पक्ष काँग्रेस नव्हे तर भाजप आहे. मुर्शिदाबाद, मालदा यासारख्या भागांतभाजपची चमकदार कामगिरीहे देशातील मतपेढीचे राजकारण अस्ताकडे जाणारे मोठे पाऊल मानले पाहिजे.BJP win in West Bengal : बंगालमध्ये कमळ फुललं, ममतांचा गड ढासळला, भाजपनं विजय कसा खेचून आणलामुस्लिम मतसंख्या निर्णायकबंगालमध्ये सुमारे ३० टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरते. पारंपरिकरित्या आधी काँग्रेस, मग डावे, नंतर तृणमूल काँग्रेस यांच्यासाठी हे मतदारसंघ सत्तेची गुरुकिल्ली मानले जात. मात्र, यावेळी या मतदारसंघांमध्येही भाजपने घेतलेली आघाडी व ममता बॅनर्जी यांच्या दशकभराच्या सत्तेला बसलेला मोठा धक्का हा केवळ निवडणूक रणनीतीचा परिणाम नसून, मतदारांच्या मानसिकतेतील परिवर्तनाचेही द्योतक मानावा लागेल.दिग्गजांच्या पंक्तीत विजयतमिळनाडूच्या राजकारणातील यंदाची उलथापालथ अभूतपूर्व आहे. अभिनेते विजय थलपथी यांच्या नव्या कोऱ्या 'तामिळगा वेत्री कळघम' ची (टीव्हीके) सुप्त लाट द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांच्या भल्याभल्या नेत्यांनाही जाणवली नाही. पदार्पणातच शंभरी गाठून राज्याची सत्ता नजरेच्या टप्प्यात आणण्याची कामगिरी करणारे एन. टी. रामाराव, अरविंद केजरीवाल (काही अंशी एम जी रामचंद्रन) यांच्या पंक्तीत विजय यांना स्थान मिळाले आहे.Kangana Ranaut : राहुल गांधींनी भाजप प्रवेश केला, तर त्यांच्याशी लग्न करेन; कंगनाने 'व्हायरल' दावे फेटाळले, राजकारणी महिलांबद्दल चिंता व्यक्तआसामात हॅटट्रिकआसामची सूत्रे काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्याकडे दिली ती किती कागदोपत्री होती व अतिअहंकारी गौरव गोगोईंवर राहुल गांधी यांचा विश्वास कसा अनाठायी होता हे आसाममधील हिमंता बिस्व सरमा यांच्या विजयाच्या हॅटट्रिकने सिद्ध झाले. थोडक्यात भाजप व काॅंग्रेस असा थेट सामना जेथे असतो तेथे काँग्रेसने ऐनवेळी हातपाय गाळते हे अनेक राज्यांप्रमाणे आसामातही दिसले.लक्षणीय बदलाची शक्यताकेरळच्या रुपाने काँग्रेसने आपल्या राज्यांच्या संख्येत केलेली वाढ आणि बंगाल, आसाम व पद्दुचेरीतील भाजप-एनडीएचा विजय यातून राष्ट्रीय पातळीवरील सत्तासंतुलनातही अदृश्य पण लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.लोकसभेत सध्याविरोधक मजबूत स्थितीतआहेत. पण दर संसद अधिवेशनात गोंधळ घालून रोजच्या रोज कामकाज बंद पाडायचे की महिला आरक्षण विधेपकाप्रमाणे एकजूट अभंग ठेवून, धारदार चर्चेने सरकारला जेरीस आणायचे याचा विचार विरोधकांना करावा लागणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ती मुख्य जबाबदारी असेल. ममता बॅनर्जी यांच्यामुळे भाजपने बंगालमध्ये चंचुप्रवेश केला, या काँग्रेसच्या आरोपात तथ्य आहेच पण ममता यांनी तसे का केले याचा विचार काँग्रेसने कधी तरी करणे अपरिहार्य आहे.Watermelon Deaths : ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवालअजिंक्य भाजपचा विरोधकांना इशाराभारतीय परिदृश्यात बंगालचे वेगळे स्थान आहे. ब्रिटिशांनी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली २३ जून १७५७ रोजी प्लासीची निर्णायक लढाई जिंकली. त्याच विजयातून भारतात ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा पाया घातला गेला. पुढची दीडशे वर्षे ब्रिटिश राजवटीने भारतात मुक्काम ठोकला. स्वातंत्र्योत्तर काळात ४ मे २०२६ रोजी बंगालचे रण जिंकून अजिंक्य भाजपने आपल्या विरोधकांना दिलेला इशारा ‘समझनेवालों को काफी है’.
भाजपच्या विजयामुळे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आले, राष्ट्रीय परिघावरील द्विध्रुवीय राजकारण संपुष्टात आले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.