नागपूर:अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, बालवयात झालेला जीवघेणा आजार आणि शिक्षणातील खंड या सर्व अडथळ्यांवर मात करत भूमी कोने या विद्यार्थिनीने लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातून बारावी आर्ट्समध्ये ७५ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, भूमी थिएटर आर्टिस्ट असून नाटकांच्या माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती करते.भूमी पाच वर्षांची असताना तिला ब्लड कॅन्सर झाला. २०११ मध्ये हा आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्याने दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यामुळे शालेय शिक्षणात खंड पडला. पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर तिला थेट पाचवीत प्रवेश देण्यात आला, ज्यामुळे अभ्यासात मोठी तफावत निर्माण झाली. आईने एकटीने खंबीरपणे संसार सांभाळत मुलींना शिक्षण दिले. मुलीच्या आजारानंतर आईने कॅन्सर रुग्णांसाठी समाजकार्य सुरू केले आणि आज ती सोशल वर्कर म्हणून कार्यरत आहे.दहावीच्या काळात अभ्यास करताना बेसिक कमकुवत असल्याने भूमीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, हार न मानता तिने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. बारावीच्या अभ्यासात एका प्रश्नासाठी पूर्ण दिवस लागत असतानाही तिने चिकाटी सोडली नाही. वर्षभर सातत्याने अभ्यास करत भूमीने आपली तयारी पूर्ण केली. परीक्षेच्या आदल्या दिवशीही ती तापाने त्रस्त होती, तरीही तिने परीक्षा दिली.कोणतीही ट्युशन न लावता, स्वअभ्यास आणि वेळेचे नियोजन यावर भर देत तिने ७५ टक्के गुण मिळवले. माझ्या परिस्थितीनुसार हे यश समाधानकारक आहे, असे ती नम्रपणे सांगते.
भूमी कोनेः चिकाटी आणि प्रतिकूलतेवर विजय मिळवण्याची कथा
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.