India A vs USA T20 World Cup 2026 warm-up match Today:७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी, सहभागी संघ सोमवारपासून सराव सामने खेळणार आहेत. भारतातील हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हे सामने खेळाडूंना मदत करतील. भारतीय संघाचा टी-२० विश्वचषकातील पहिला सामना अमेरिका संघाविरूद्ध मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी आज भारताचा अ संघ अमेरिकेविरूद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया. अमेरिकेचा संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. संघाचा पहिलाच सामना गतविजेत्या भारतीय संघाविरूद्ध होणार आहे. हा वर्ल्डकपमधील पहिला सामना वानखेडे स्टेडियममुंबईयेथ ७ फेब्रुवारीला होईल. तत्पूर्वी संघ नवी मुंबईत सराव सामना खेळणार आहे. भारत अ संघात तिलक वर्मादेखील हा सराव सामना खेळाना दिसेल. तिलक वर्मा युएईविरुद्ध खेळताना दिसणार आहे आणि दुखापतीनंतर पुनरागमन करत असताना तो त्याचा फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. युएईविरुद्धच्या सामन्यासाठी इंडिया अ संघाचा कर्णधार आयुष बदोनी आहे. या संघात रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, खलील अहमद आणि मयंक यादव सारखे खेळाडू असतील. सामना लाईव्ह कसा पाहायचा ते जाणून घेऊया. भारत अ विरुद्ध अमेरिका टी-२० विश्वचषक २०२६ चा सराव सामना आज म्हणजेच सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ४.३० वाजता होणार आहे. भारत अ विरुद्ध अमेरिका टी२० विश्वचषक २०२६ चा सराव सामना जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. अमेरिकाविरूद्ध सराव सामन्यासाठी भारत अ संघ आयुष बदोनी (कर्णधार), नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्य, एन जगदीसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रियान पराग, मानव सुतार, अशोक शर्मा, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), गुरजपनीत सिंग, विपराज निगम, रवी बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव अमेरिकेचा टी-२० विश्वचषक २०२६ साठीचा संघ मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रिज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सईतीजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नॉथुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे
भारत अ विरुद्ध अमेरिका टी-20 विश्वचषक सराव सामनाः वेळापत्रक, संघ आणि प्रमुख खेळाडू
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.