भारत-अमेरिका व्यापार करारात भारतीय अर्थव्यवस्थेतील संवेदनशील अशा कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांना संरक्षण देण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. कराराबाबत या आठवड्यात संयुक्त निवेदन जारी केले जाईल असे सुत्रांनी नमूद केले. हा करार सातत्यपूर्ण संयम आणि संतुलित धोरणाचा परिणाम आहे अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्याचे वर्णन केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करारावर टीका केली. या करारामुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध होतील, असेही पीयूष गोयल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गोयल म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उपयोग करून पंतप्रधानांनी अमेरिकेशी व्यापार करार अंतिम केला. हा आमच्याशी स्पर्धा करणार्या सर्व देशांच्या तुलनेत भारतासाठी सर्वोत्तम आहे. सरकार संसदेत या करारावर निवेदन देऊ इच्छित होते; मात्र विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही, असेही त्यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत निर्णायक भूमिका बजावत असून जग भारताच्या बाजूने झुकू लागले आहे, असे ठाम मत पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘एनडीए’च्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी भारत-युरोपीय संघ आणि भारत-अमेरिका व्यापार करारांचा संदर्भ देत भारताचे वाढते जागतिक महत्त्व अधोरेखित केले. भारत, अमेरिका लवकरच कराराची तपशीलवार माहिती देतील. करारावर सही आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती जाहीर केली जाईल.– पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री कृषी उत्पादनांच्या किमती वाढून अमेरिकेतील शेतकर्यांचा फायदा होईल. याद्वारे अर्थव्यवस्था बळकट होईल.– ब्रुक रोलीन्स, कृषिमंत्री, अमेरिका व्यापार कराराने भारताच्या निर्यातीला आणखी बळ मिळणार आहे.– निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री हा करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांचे रक्त आणि घाम विकला आहे. हा देशाच्या हिताशी सरळसरळ विश्वासघात आहे.–राहुल गांधी,विरोधी पक्षनेते प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षित असलेला भारत-अमेरिका व्यापार करार आणि रुपयाच्या मजबुतीमुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी मोठी झेप नोंदवली. सलग दुसर्या दिवशाच्या या मुसंडीत, सेन्सेक्स २,०७२.६७ अंशांनी वधारून, ८३,७३९.१३ पातळीवर स्थिरावला. निफ्टीने देखील ६३९.१५ अंशांची कमाई करून २५,७२७.५५ पातळीवर बंद नोंदवला. दुसरीकडे रुपया १२२ पैशांनी वधारून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९०.२७ पातळीवर बंद झाला. मंगळवारी ते सर्वोत्तम कामगिरी करणारे आशियाई चलन ठरले.
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे संवेदनशील कृषी उत्पादनांचे संरक्षण, नव्या संधी उपलब्ध
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.