India vs NewZeland 3rd ODI Weather Update:शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पुनरागमन केलं आणि दमदार विजय मिळवला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना आता दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना १८ जानेवारीला इंदुरमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यावेळी कसं असेल हवामान? जाणून घ्या. कसं असेल हवामान? भारत आणि न्यूझीलंड हा सामना मालिकेतील निर्णायक सामना असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना इंदुरच्या आहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान १८ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात इंदुरमधील तापमान २७ डिग्री इतकं असेल. तर पाऊस पडण्याची शक्यता ही ० टक्के असणार आहे. वारे ११ किमी प्रतितास वेगाने वाहतील. तर सामन्यावेळी दिवसभर ऊन असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५०-५० षटकांचा पूर्ण सामना पाहायला मिळेल. भारतीय संघाला पहिल्या सामन्यानंतर मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिग्ंटन सुंदर वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू आयुष बदोनीला संघात स्थान देण्यात आलं आहे. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. दुसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश करण्यात आला होता. आता तिसऱ्या सामन्यात आयुष बदोनीला पदार्पण करण्याची संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ: भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा,केएल राहुल(यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव,अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, आयुष बदोनी.
भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 रा एकदिवसीय सामनाः हवामान परिस्थिती क्रिकेटला अनुकूल
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.