Achira News Logo
Achira News

भारताच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख विभागांचा कार्यभार स्वीकारला

Maharashtra Times
भारताच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख विभागांचा कार्यभार स्वीकारला
Full News
Share:

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई:उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालनेच कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला. अजित पवार यांच्या कार्यालयासाठी पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील दालने देण्यात आली असून तीच दालने सुनेत्रा पवार यांच्यासाठी कायम ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या पदाची सूत्रे या आठवड्याअखेरीस स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अजित पवारयांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने तसेच दालन क्रमांक ७१७मधील निधी कक्षातून आत प्रवेश केल्यानंतरचा कक्ष, दालन क्रमांक ७२२ व ७२३, तसेच पाचव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन क्रमांक ५०३ हे कार्यालयीन दालन म्हणून वापरण्यास देण्यात आले आहे.Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा कराड दौरा ठरला नि:शब्द, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिलाच दौरा; प्रीतिसंगमावर केलं अभिवादन‘देवगिरी’ही देणार?मलबार हिलयेथील ‘देवगिरी’ हे शासकीय निवासस्थानही सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांचे वास्तव्य ‘देवगिरी’ येथे राहिले.चव्हाणांना अभिवादनउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करूनअभिवादन केले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.सुनेत्रा पवार विदीप जाधवांच्या घरी, कुटुंबियांचं सांत्वन; पत्नीला धीर देताना काय म्हणाल्या?उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीपदाची शपथ घेतल्यानंतरप्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. स्व. अजित पवार यांचे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यांची आठवण या वेळी उपस्थितांना झाली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारताच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख विभागांचा कार्यभार स्वीकारला | Achira News