Achira News Logo
Achira News

भारताच्या चांदीच्या व्यवसायाला अभूतपूर्व दरवाढीचा फटका

Pudhari
भारताच्या चांदीच्या व्यवसायाला अभूतपूर्व दरवाढीचा फटका
Full News
Share:

एक ते दीड महिन्याच्या कालावधीत एक लाख रुपयांच्या जवळपास खेळत असणाऱ्या चांदी दराने ‌‘न भूतो, न भविष्यती‌’ असा तब्बल 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. सातत्याने होत असलेल्या भरघोस दरवाढीने देशातील बाजारपेठेवरील दागिन्यांच्या मागणीत मोठ्याप्रमाणात घट झाली होती. परिणामी, चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. यापुढील कालावधीत चांदी व्यवसायाचे भविष्य अंधःकारमय झाल्याने हुपरी व परिसरातील चांदी व्यावसायिक अनेक प्रकारच्या विवंचनेत सापडला होता. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या येथील चांदी व्यवसायाचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ ठरली होती. संपूर्ण चांदी व्यवसायाच्या जणू मुळावरच दरवाढ उठल्याने सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवहार काही काळासाठी बंद ठेवणे पसंद केले आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारताच्या चांदीच्या व्यवसायाला अभूतपूर्व दरवाढीचा फटका | Achira News