नवी दिल्ली : भारतातील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी, पदवीधरांच्या हाताला काम मिळण्याचे प्रमाण मात्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या 'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया' अहवालानुसार, देशातील २० ते २९ वयोगटातील ६.३ कोटी पदवीधरांपैकी तब्बल १.१ कोटी पदवीधर बेरोजगार आहेत. वयोगटबेरोजगारीप्रमाण (%)२० ते २५ - ४०%२५ ते २९ - २०% तरुणांमधीलबेरोजगारीचाविळखा -२००४-०५ पासूनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५० लाख पदवीधरांची भर पडते. त्यापैकी केवळ २८ लाख पदवीधरांनाच नोकरी मिळविण्यात यश येते. नोकरी मिळवण्यात अनंत अडचणी -स्वतःला बेरोजगार म्हणून नोंदवणाऱ्या पदवीधरांपैकी केवळ ७ टक्के तरुणांनाच पदवी मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत कायमस्वरूपी पगाराची नोकरी मिळवण्यात यश येते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामाच्या ठिकाणी होणारे हे स्थित्यंतर आव्हानात्मक असल्याचे अहवालात म्हटले आहे. वेतनश्रेणीतील स्त्री-पुरुष -पदवीधर नसलेल्या उमेदवारांपेक्षा पदवीधरांचे सुरुवातीचे वेतन दुप्पट असते. मात्र, गेल्या काही वर्षांत पदवीधर पुरुषांच्या सुरुवातीच्या पगारवाढीचा वेग मंदावला आहे.चांगली बाब म्हणजे, वेतन श्रेणीतील स्त्री-पुरुष भेदभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, जे तरुण महिलांसाठी श्रम बाजारातील सुधारलेले निकाल दर्शवते.
भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राचा विस्तार, मात्र रोजगाराच्या शक्यता धोक्यात
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.