Achira News Logo
Achira News

भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

Pudhari
भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
Full News
Share:

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वीच टीडीआर प्रक्रियेला गती देण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रस्तावाच्या टप्प्यांची संख्या कमी करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि निश्चित कालमर्यादेत प्रकरणे निकाली काढणे यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विधी विभागाकडून 45 दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतर त्रुटी दुरुस्तीसाठी 90 ते 120 दिवसांचा कालावधी निश्चित करण्याचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्यात भूमी अभिलेख विभागाकडून होणारी मोजणी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी सुरुवातीपासूनच सहभागी होण्याचा पर्याय तपासला जात आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश | Achira News