वृत्तसंस्था, नवी दिल्ली :भारतातील २० ते २९ वयोगटातील ६.३ कोटी पदवीधारकांपैकी १.१ कोटी पदवीधर बेरोजगार असल्याची माहिती अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या अहवालात समोर आली.स्टेट ऑफ वर्किंग इंडियाया अहवालात स्पष्ट झाले की, वर्षभरात केवळ ७ टक्के पदवीधरांना कायमस्वरूपी पगारी नोकरी मिळाली.अहवालानुसार, बेरोजगारांमध्ये १५ ते २५ वयोगटातील पदवीधरांची संख्या ४० टक्के असून २५ ते २९ वयोगटातील बेरोजगार पदवीधरांची संख्या २० टक्के आहे. पदवीधर होणाऱ्यांची संख्या वाढल्याने मागील वर्षात पदवीधर बेरोजगारांची समस्या समोर आली आहे, असेही अहवालात म्हटले आहे.West Bengal Election 2026: तृणमूल काँग्रेस 226 जागा जिंकेल! ममता बॅनर्जींना विश्वास, उमेदवारांची घोषणागेल्या काही दशकांमध्येतरुणांच्या लोकसंख्येत मोठी वाढझाली आहे आणि उच्च शिक्षणातील नोंदणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पदवीधरांच्या एकूण संख्येत भर पडली आहे.कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण सोडण्याचे सामान्य कारण अनेकदा दिले जाते. २०१७ मध्ये या कारणाने शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण ५८ टक्के होते, ते २०२३ पर्यंत वाढून ७२ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे अहवालातून स्पष्ट होते. शिक्षण घेणाऱ्या तरुण पुरुषांचे प्रमाण २०१७ मधील ३८ टक्क्यांवरून २०२४ च्या अखेर ३४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. २००४-०५ आणि २०२३ दरम्यान दर वर्षी जवळपास ५० लाख तरुण पदवीधर होऊन बाहेर पडले. मात्र, त्यातील केवळ २८ लाख पदवीधरांना नोकरीची संधी मिळाली, असे अहवालात म्हटले आहे.Indore Fire : इलेक्ट्रिक कार चार्ज करताना आग, एकामागून एक सिलेंडर फुटले, कुटुंबातील सात जणांचा मृत्यू, डिजिटल लॉकमुळे कोंडीअहवालानुसार...-पदवीधरांचे पगार पदवीधर नसलेल्यांच्या तुलनेत सुरुवातीला दुप्पट असतात-वयानुसार ही तफावत वाढत जाते-अलीकडच्या काळात तरुण पदवीधरांच्या सुरुवातीच्या पगारातील वाढ तुलनेत घटली आहे-दुसरीकडे, पदवीधर महिला आणि पुरुषांच्या पगारातील तफावत बरीच कमी झाली आहे
भारतातील पदवीधर बेरोजगारीचे संकटः अहवालात चिंताजनक आकडेवारी उघड
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.