Achira News Logo
Achira News

भारताने महाबळेश्वर-पचगनी क्षेत्र पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले, अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश

Lokmat
भारताने महाबळेश्वर-पचगनी क्षेत्र पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले, अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश
Full News
Share:

पाचगणी : महाबळेश्वर–पाचगणी परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे या भागात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून तालुक्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे उभारण्यात आल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महाबळेश्वर तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या असून, सात दिवसात बांधकामे काढून घ्यावीत, असे आदेश दिले आहेत.केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी १७ जानेवारी २००१ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार महाबळेश्वर – पाचगणी परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच मंजूर महाबळेश्वर - पाचगणी प्रादेशिक योजना २००२ ते २०२२ नुसार या क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, सातारा यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे.या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तहसीलदार सचिन मेस्के यांनी संबंधितांना नोटिसा बजावून स्पष्ट केले आहे की, नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधितांनी स्वखर्चाने अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे. अन्यथा प्रशासनाकडून बांधकाम पाडण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.दरम्यान, ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संबंधित खातेदारांना नोटिसा बजावून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंत्र्यांना साकडे घालणारपाचगणी – महाबळेश्वर पर्यटनावर स्थानिकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने घरांवर व व्यवसायांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय सहन केला जाणार नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजेंद्र शेठ राजपुरे यांनी दिला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारताने महाबळेश्वर-पचगनी क्षेत्र पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले, अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश | Achira News