Achira News Logo
Achira News

भारताने विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

Lokmat
भारताने विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
Full News
Share:

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, विक्रम दोराईस्वामी यांचीचीनमधीलभारताचेनवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९२ च्या तुकडीचेभारतीयपरराष्ट्र सेवा अधिकारी असलेले दोराईस्वामी सध्या ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. ते आताचीनमध्येप्रदीप कुमार रावत यांची जागा घेणार आहेत. दोराईस्वामी यांना मँडरिन, फ्रेंच आणि काही प्रमाणात कोरियन भाषा अवगत आहे. विक्रम दोराईस्वामी हे दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आयएफएसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष पत्रकार म्हणून काम केले. पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणूनही काम पाहिलेदिल्लीतील सेवाकालीन प्रशिक्षणानंतर (१९९२-१९९३), मे १९९४ मध्ये त्यांची हाँगकाँग येथे नियुक्ती झाली. तेथे त्यांनी चिनी भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला. सप्टेंबर १९९६ मध्ये चार वर्षांच्या कार्यकाळासाठी बीजिंग येथे बदली झाली. त्यांनी पंतप्रधानांचे खासगी सचिव तसेच अन्य महत्त्वाच्या पदावर काम केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारताने विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. | Achira News