Achira News Logo
Achira News

भारतीय कॉमेडियन सुनील पाल आणि समय रैना सार्वजनिक भांडणात गुंतले

Maharashtra Times
भारतीय कॉमेडियन सुनील पाल आणि समय रैना सार्वजनिक भांडणात गुंतले
Full News
Share:

मुंबई: लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल आणि आजच्या पिढीचा लोकप्रिय स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेला शाब्दिक वाद सर्वश्रुत आहे. हे दोघे'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडमध्ये आमनेसामने आले मात्र, कपिल शर्मा शोच्या मंचावर ज्या प्रकारे समय रैनानं सुनील पाल यांची फिरकी घेतली, ते पाहून सोशल मीडियावर "सुनील पाल यांचा अपमान झाला" अशी चर्चा रंगली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द सुनील पाल यांनी भाष्य केलं आहे.नेमकं प्रकरण काय?'वर्ल्ड लाफ्टर डे'निमित्त आयोजित विशेष भागात समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया पाहुणे म्हणून आले होते. याच भागात सुनील पाल यांनी अचानक एन्ट्री घेतली. शो दरम्यान, समय रैनानं सुनील पाल यांच्यावर एकामागून एक उपरोधिक टोले लगावले, त्यांची खिल्लीही उडवली."सुनील भाई, तुमचं सर्व काही ठीक आहे, पण तुम्ही दात का घास नाही?" किंवा "ते नेहमी चप्पल का घालतात? कारण बूट तर त्यांच्यावर लोक फेकतच असतात," अशा तिखट कमेंट्स समयनं शोमध्ये केल्या होत्या.हे पाहून अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती की, एका ज्येष्ठ कलाकाराला शोमध्ये बोलवायचं आणि मग त्यांचा अशा प्रकारे 'अपमान' करणं चुकीचं आहे.सुनील पाल यांचं उत्तरया 'अपमानस्पद' एपिसोडबद्दल बोलतानाMardini First look:श्रेयस तळपदे , प्रार्थना बेहेरे, मायरा पुन्हा एकत्र; सिनेमाचा फर्स्ट लुक व्हायरलम्हणाले की, मी याला अपमान मानत नाही. तो एक कॉमेडी शो आहे आणि अशा शोजमध्ये एकमेकांची टांग खेचणं ही सामान्य बाब आहे. जर हा एखादा गंभीर विषय असता, तर मी नक्कीच तक्रार केली असती. पण तिथं आम्ही एकमेकांवर जोक्स मारत होतो. मी सुद्धा त्याच्यावर पंचलाईन्स मारल्या. तसंच मला आधीच माहित होतं की समय तिथं असणार आहे. मला माझे विचार मांडण्यासाठी बोलावलं होतं आणि मी ते मांडले.माझं कोणाशीही वैयक्तिक भांडण नाही. माझा विरोध फक्त शिवराळ भाषेला आहे, जी आजची 'जेन-जी' पिढी कॉमेडीच्या नावाखाली वापरते. तसंच कॉमेडी मंचावर शाहरुख खानसारख्या मोठ्या स्टार्सचीही थट्टा उडवली जाते, मग मी तर एक छोटा कलाकार आहे," असंही त्यांनी नमूद केलं.दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये समयनं सुनील पाल यांच्या जुन्या विधानाचा समाचार घेतला, ज्यात पाल यांनी समयला 'कॉमेडीचा दहशतवादी' म्हटलं होतं. समय म्हणाला की, "जेव्हा आपल्याच क्षेत्रातील लोक संकटाच्या काळात पाठिंबा देण्याऐवजी टीका करतात, तेव्हा वाईट वाटतं.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय कॉमेडियन सुनील पाल आणि समय रैना सार्वजनिक भांडणात गुंतले | Achira News