कायदा काय सांगतो डॉ. माने यांनी कायद्याचा दाखला देत स्पष्ट केले की, दुबार मतदान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950: कलम 17 व 18, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 : कलम 62 (3) व (4) या कलमान्वये दोषी आढळल्यास संबंधित मतदारावर फौजदारी खटला भरला जाऊ शकतो. शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 1 लाख 48 हजार 518 महिला, तर 1 लाख 53 हजार 425 पुरुष व 13 इतर असे एकूण 3 लाख 1 हजार 956 मतदार आहेत. पाबळ जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 46 हजार 620, तर पंचायत समितीच्या केंदूर गणात सर्वाधिक 23,330 मतदार आहेत. जिल्हा परिषदेसाठी 7 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. 9 फेबुवारी रोजी कारेगाव येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
भारतीय कायद्यानुसार निवडणूक गैरवेव्हाराच्या दंडाची रूपरेषा आखण्यात आली आहे
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.