Achira News Logo
Achira News

भारतीय राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे हप्ते देऊन दिलासा दिला

Pudhari
भारतीय राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे हप्ते देऊन दिलासा दिला
Full News
Share:

दरम्यान, ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसल्या. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच नियम आणि अटी डावलून करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना आधीच दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना आता 4500 रुपये मिळणार, तर ज्यांना दोन हप्ते मिळाले त्यांना मात्र जानेवारीचा एकच हप्ता मिळणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे हप्ते देऊन दिलासा दिला | Achira News