विमान प्रवासात क्रीडा साहित्य, संगीत वाद्ये आणि पाळीव प्राणी सोबत नेण्याबाबत आता विमान कंपन्यांना स्पष्ट आणि पारदर्शक नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेकदा या वस्तूंच्या वाहतुकीसाठी आकारले जाणारे अवाढव्य शुल्क आणि विसंगत नियमांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत, सुरक्षा नियमांचे पालन करूनच पण प्रवाशांना समजेल अशा सोप्या भाषेत ही धोरणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांना त्यांचे अधिकार नीट कळावेत यासाठी ही माहिती आता प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. Ministry of Civil Aviation Strengthening Passenger Facilitation in Indian AviationPlease read:https://t.co/CetbI58zGM@RamMNK@mohol_murlidhar@samirsinha69@MoCA_GoI@DGCAIndia@PIB_India
भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाने विमानात क्रीडा उपकरणे, पाळीव प्राणी आणि संगीत वाद्ये वाहून नेण्यासाठी स्पष्ट नियम अनिवार्य केले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.