Achira News Logo
Achira News

भारतीय शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना मोठा तोटा, शेअर बाजारात 2164 अंकांची घसरण

Lokmat
भारतीय शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना मोठा तोटा, शेअर बाजारात 2164 अंकांची घसरण
Full News
Share:

Stock Market Crash Live Updates:शेअर बाजारामध्येआज चौफेर घसरण पाहायला मिळत असूनगुंतवणूकदारांचंमोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे. त्याचप्रमाणे निफ्टी ६७२ अंकांच्या घसरणीसह २३,१०५ वर पोहोचला आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी केवळ ओएनजीसी (ONGC) हा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये आहे, तर सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. दरम्यान, यामुळेगुंतवणूकदारांचं८.५ लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं. भारतीय बाजारपेठेत आलेल्या या भूकंपामुळे अनेक दिग्गज आणि मिडकॅप शेअर्समध्ये तीव्र विक्री दिसून आली. सेन्सेक्सवर इटरनल ५.४६%, बजाज फायनान्स ५.३४%, महिंद्रा अँड महिंद्रा ४.८६%, एलअँडटी ४.५७%, एचडीएफसी बँक ४.३५%, इंडिगो ४.२१% आणि बजाज फिनसर्व्ह ४.०८ टक्क्यांनी घसरले आहेत. केमिकल क्षेत्रातील कंपनी 'कॅमलिन फाईन सायन्सेस'मध्ये सर्वाधिक ६.८७% घसरण झाली असून तो शेअर १२०.६० रुपयांवर आला आहे, तर फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिप्लामध्येही २ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. क्षेत्रीय नुकसानीचा विचार करता, निफ्टी ऑटो ४.१% पेक्षा जास्त कोसळला आहे. रिअल्टी क्षेत्रात ३.४% तर मेटल, आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि बँकिंग निर्देशांकात सुमारे ३ टक्क्यांची घसरण झाली. मध्य पूर्वेतील संघर्षा मुळे तेल आणि वायूच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे महागाई वाढण्याची आणि आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा दबाव जागतिक इक्विटी मार्केटवर दिसून येत आहे. युरोपचा 'स्टॉक्स ६००' १.२ टक्क्यांनी घसरून या वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर आला आहे, तर MSCI आशिया पॅसिफिक इंडेक्समध्ये २.७% आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील इक्विटीमध्ये २.६% घट झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात भूकंप; ₹१३,००० नं आपटले चांदीचे दर; Gold च्या दरातही मोठी घसरण कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी कायम असून ब्रेंट क्रूड सुमारे ५.७ टक्क्यांनी वधारून ११३ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलं आहे. युद्ध सुरू झाल्यापासून यात सुमारे ४८ टक्क्यांची वाढ झाली. एका महत्त्वाच्या एलएनजी निर्यात केंद्राचं नुकसान झाल्यामुळे युरोपियन नॅशनल गॅसच्या किमतीत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, यामुळे पुरवठा विस्कळीत होण्याची चिंता अधिक गडद झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना मोठा तोटा, शेअर बाजारात 2164 अंकांची घसरण | Achira News