Share Market:शेअर बाजारावरमंगळवारी दबाव कायम राहिला. BSE Sensex २५१.६१ अंकांनी घसरून ७७,०१७.७९ वर बंद झाला, तर Nifty 50 ८६.५० अंकांनी घसरत २४,०३२.८० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्स सुमारे ७५० अंकांपर्यंत कोसळला होता; मात्र शेवटी काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली. बाजारातील एकूण चित्र वाढ झालेले शेअर्स: १,८९०घसरलेले शेअर्स: २,११०स्थिर शेअर: १६९ यावरून बाजारातील कमजोरी स्पष्ट दिसून आली. घसरणीमागील प्रमुख कारणे भूराजकीय तणाव: Strait of Hormuz परिसरात अमेरिका-इराण तणाव वाढलाकच्च्या तेलाच्या किमतीत वाढ: ब्रेंट क्रूड ११४ डॉलर प्रति बॅरलरुपयाची घसरण: डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी स्तर या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम बाजारावर झाला. NSE मधील टॉप-५ घसरणारे शेअर्स ICICI Bank: -१.५७%Jio Financial Services: -१.४८%Coal India: -१.४८%Tech Mahindra: -१.३९%Axis Bank: -१.३६% रुपया विक्रमी नीचांकीवर रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.२५ या नव्या विक्रमी नीचांकी स्तरावर बंद झाला. इंट्रा-डे ट्रेडमध्ये तो ९५.४४ पर्यंत घसरला होता. ओपनिंग: ९५.३०इंट्रा-डे लो: ९५.४४क्लोजिंग: ९५.२५ मध्यपूर्वेतील तणाव, सप्लाय चेनची चिंता आणिगुंतवणूकदारांचीजोखीम टाळण्याची प्रवृत्ती यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. (टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हागुंतवणूकीचासल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
भारतीय शेअर बाजारात घसरणीचा कल कायम
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.