Gold Markets in India:गेल्या एका वर्षभरात सोन्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. कधीकाळी केवळ हजारांमध्ये असलेल्या सोन्याचा दर आता लाखांपर्यंत पोहोचाल आहे, पण तरीही लोकांचा सोनं खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. अनेक लोक सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी दुबईला जातात मात्र, भारतातही दुबईला टक्कर देणारे ‘गोल्ड मार्केट’ आहे जिथे स्वस्त किंमतीत सोनं खरेदी करता येते.सोन्याचा आजचा दर कायगेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचंड स्वस्त झालेल्या सोन्याच्या किमतीत बुधवारी, 20 मार्च रोजी 1.68% किंवा 2428 वाढ झाली 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.47 लाखांवर पोहोचला.भारतातील टॉप-10 स्वस्त गोल्ड मार्केटदुबईप्रमाणेच मुंबईही भारताचे ‘गोल्ड सिटी’ म्हणून ओळखली जाते. मुंबईतील झवेरी बाजार देशातील सर्वात प्रमुख ‘सोन्याचे मार्केट’ आणि दुबईच्या बाजाराशी स्पर्धा करेल इतके मोठे आहे. त्यानंतर, चेन्नई, कोची, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता हेही मोठे आणि देशातील स्पर्धात्मक गोल्ड मार्केटपैकी आहेत. या गोल्ड मार्केटमध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनचे दागिने उत्कृष्ट दरात मिळतात.मुंबईतील झवेरी बाजारभारतातील सर्वात मोठे सोन्याच्या व्यापाराचे केंद्र म्हणूनच मुंबईची दुबईच्या गोल्ड मार्केटशी तुलना केली जाते. मुंबईतील मुंबा देवी मंदिराजवळील झवेरी बाजारात केवळ सोन्याचा व्यापारीच होत नाही तर, येथे मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते.जळगाव - भारतातील ‘सुवर्ण बाजारपेठ’मुंबईनंतर महाराष्ट्रातील जळगाव दुसरी मोठी बाजारपेठ आहे, जिथं सराफांची मोठी साखळी आहे. 160 वर्षांची सोन्याची परंपरा असणाऱ्या जळगावला ‘सुवर्णनगरी’ म्हणूनही ओळखले जाते. शुद्ध सोनं आणि गुणवत्तेमुळे देशभरातील लोक जळगावच्या सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येतात.चेन्नईउच्च दर्जा, शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी (22 ते 24 कॅरेट) चेन्नई शहर प्रसिद्ध आहे. येथे पारंपरिक, बारिक कारागिरीचे दागिने घडवले जाते, ज्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे.कोचीकेरळच्या गोल्ड मार्केटमध्ये सराफांमध्ये तीव्र स्पर्धा पहायला मिळते आणि दरडोई सोन्याच्या सर्वाधिक वापराचे केंद्र मानले जाते. इथं अनेक व्यापार स्पर्धेत कायम राहण्यासाठी कमी दर ऑफर करतात आणि सोन्याच्या दागिन्यांवर कमी मेकिंग चार्ज आकारला जातो ज्यामुळे ग्राहकांना कमी दरात सोनं खरेदी शक्य होते.बेंगळुरू (कर्नाटक)उच्च विश्वासार्हता, नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उच्च-मूल्याच्या विक्रीसाठी बेंगळुरू एक मजबूत, आधुनिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.हैदराबाद (तेलंगणा)सोन्यातील वाढत्या गुंतवणुकीचे दक्षिण भारतातील एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणारे हैदराबादमध्ये खास पारंपरिक डिझाईनचे दागिने मिळतात. म्हणूनच या शहरातील सोन्याचे बाजार नेहमीच गजबजलेले असते.दिल्ली (एनसीआर)दिल्लीत सध्या उत्तर भारतातील मोठे गोल्ड मार्केट असून इथे ग्राहकांना डिझाइन्समध्ये विविधता मिलते आणि व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी किमतीत दागिने उपलब्ध होतात.कोलकाता (पश्चिम बंगाल)पारंपरिक, नाजूक आणि अत्यंत कुशलतेने हाताने बनवलेल्या सोन्याच्या दागिने, बंगाली डिझाइनच्या दागिन्यांसाठी कोलकाता मार्केट लोकप्रिय आहे.जयपूर (राजस्थान)कुंदन आणि मीनाकारी दागिने - पारंपरिक जयपुरी शैली, ज्यात आकर्षक एनॅमलचे काम असते आणि लग्न सोहळ्यासाठी अत्यंत शोभून असलेल्या दागिन्यांसाठी शहर प्रसिद्ध आहे. जयपूरमधील दागिन्यांमध्ये शाही थाट दिसून येतो.अहमदाबाद आणि सुरतअहमदाबाद आणि सुरत गुजरातमधील ही दोन शहरेही भारतातील गोल्ड मार्केटपैकी आहेत. सणासुदीच्या दिवसात अहमदाबादच्या गोल्ड बाजारात लोकांची लगबग वाढते तर, सुरतला डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी आणि हलके वजन आणि मशीनवर दागिने तयार केले जातात.
मागणी मजबूत राहिल्याने भारताच्या सोन्याच्या बाजारपेठेत दुबईशी स्पर्धा
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.