Achira News Logo
Achira News

मिझोराममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद कृत्यांसाठी सात परदेशी नागरिकांना अटक

Lokmat
मिझोराममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद कृत्यांसाठी सात परदेशी नागरिकांना अटक
Full News
Share:

मिझोरममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद हालचालींप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7 परदेशी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. यूक्रेनचे 6 आणि अमेरिकेचा 1 नागरिक अटकेत असून, ते भारताचा वापर करूनम्यानमारमध्येजाण्यासाठी ‘ट्रांझिट कॉरिडॉर’ तयार करत होते. एवढेच नाही तर तो ड्रोन आणि आधुनिक युद्ध तंत्राचे प्रशिक्षणही देत ​​होते, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एनआयएच्या दोन टीम स्लीपर सेल मॉड्यूलच्या शोधात मिझोरम-म्यानमारसीमेवर पोहोचल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय संयुक्त तपास पथकाला माहिती मिळाली की, या मॉड्यूलला मिझोराम-म्यानमार सीमेवरील स्थानिक नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता. हे नागरिक भारत आणि म्यानमार या दोन्ही देशातील आहेत. केंद्रीय तपास पथकही म्यानमारच्या तपास यंत्रणांच्या संपर्कात असून, येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून ड्रोन आणि आधुनिक युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, त्यांचे भारतविरोधी किंवा प्रतिबंधित संघटनांशी संबंध असू शकतात, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात गुप्तहेरगिरीचा कोनही तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की ‘मॅथ्यू’ नावाचा एक अमेरिकन नागरिक परदेशातील काही ख्रिश्चन संस्था आणि धार्मिक गटांकडून देणगी गोळा करत होता. ही रक्कम सामाजिक आणि धार्मिक कार्यांसाठी घेतली जात असल्याचे सांगितले जात होते; मात्र त्यातील काही निधी भारत-म्यानमार सीमेवरील बंडखोर गटांकडे वळवण्यात आल्याचा संशय आहे. अशीही माहिती समोर आली आहे की, काही विदेशी भाडोत्री लढवय्ये म्यानमारमधील गृहयुद्धात सहभागी होण्यासाठी भारताचा मार्ग वापरत होते. हे लढवय्ये नेमके कोणासाठी काम करत होते, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यूक्रेनचा मारियन स्टेफानकिव याचाही समावेश असून, त्याला डोनबास संघर्षाचा अनुभव असल्याचा संशय आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मिझोराममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद कृत्यांसाठी सात परदेशी नागरिकांना अटक | Achira News