मुंबई -हॉलवूड आणि फॅशन जगतातील सर्वात मोठा ' मेट गाला ' हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 'मेट गाला' हा दरवर्षी होणारा एक मोठा कार्यक्रम असून २०२६ मध्येही हा कार्यक्रम सेलिब्रिटींच्या रेड कार्पेटवरील लूकमुळे चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून, मेट गालाचं आयोजन व्होग मासिकाच्या जागतिक संपादकीय संचालक अॅना विंटूर यांच्या देखरेखीखाली केलं जातंय. या कार्यक्रमात प्रवेश मिळवणं हे त्याचे नियम पाळण्याइतकंच आव्हानात्मक आहे. यापैकी एक नियम असा आहे की, नवरा-बायको एकत्र बसू शकत नाहीत. याच नियमाचं पालन न केल्यास कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते.पती-पत्नी एकत्र का बसत नाहीत?मेट गालासाठी बसण्याची व्यवस्था खूप आधीच तयार केली जाते. एकविशेष नियमअसा आहे की, कोणताही पाहुणा आपल्या जोडीदारासोबत बसू शकत नाही. आयोजकांची इच्छा असते की लोकांनी नवीन लोकांना भेटावं आणि त्यांच्याशी संवाद साधावा. बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाते की, विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र बसून नवीन विषयांवर चर्चा करू शकतील.Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...'जेवणात लसूण आणि कांद्यावर बंदीमेट गालाच्या मेन्यूमध्ये लसूण आणि कांद्याला सक्त मनाई आहे. आयोजकांच्या मते, तोंडाची दुर्गंधी आणि संवादातील अडचणी टाळण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही.पाहा: प्रियांकाच्या 'त्या' पेहरावाची अशीही कहाणी!फोनवर बंदीमेट गालामध्येउपस्थितराहण्यासाठी पाहुणे किमान १८ वर्षांचे असणं आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फोनचा वापर आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे. पाहुण्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपली प्रायव्हसी जपावी, अशी आयोजकांची इच्छा आहे.Tharala Tar Mag Promo : याचसाठी केलेला अट्टाहास! सायलीनं खोट्या तन्वीला मारून-मारून केलं बेहाल, लवकरच 'ठरलं तर मग' मालिकेत होणार प्रियाचा पर्दाफाशधूम्रपान आणि ड्रेस कोडहा कार्यक्रम न्यूयॉर्क शहरात आयोजित केला जात असल्यामुळे, शहराच्यानियमांनुसारधूम्रपानास सक्त मनाई आहे. ड्रेस कोडबद्दल बोलायचं झाल्यास, २०२६ ची थीम 'कॉस्ट्यूम आर्ट' आहे आणि ड्रेस कोड 'फॅशन इज आर्ट' आहे. यावर्षी, सेलिब्रिटींनी त्यांच्या पोशाखातून आपला लूक कॅनव्हासप्रमाणे सादर केला आहे.Anupam Kher : मी तुझं काय वाईट केलंय? बंगाल जिंकताच भाजप नेत्यानं काढला अनुपम यांच्या नसलेल्या केसांचा विषय; अभिनेत्याचं चोख उत्तरत्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे, 'मेट गाला'चं तिकीट जे एकेकाळी फक्त ५० रुपये डॉलरला मिळायचं , ते यावेळी जवळपास १ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९० लाख रुपयांना मिळत आहे. याशिवाय, जर तुम्हाला या कार्यक्रमात टेबल बुक करायचं असेल, तर तुम्हाला ३ लाख ५० हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
मेट गाला व्हायरलः सेलिब्रिटींचे लाल गालिचेचे स्वरूप आणि बसण्याचे अपारंपरिक नियम
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.