Achira News Logo
Achira News

मेट्रो प्रकल्पाला विलंब, कल्याण-डोम्बिवलीमध्ये वाहतूक कोंडी; परीक्षा लांबणीवर

Pudhari
मेट्रो प्रकल्पाला विलंब, कल्याण-डोम्बिवलीमध्ये वाहतूक कोंडी; परीक्षा लांबणीवर
Full News
Share:

कल्याण-डोंबिवलीमधील मेट्रो प्रकल्पाची कामे काटई नाका, पलावा, मानपाडा, सोनारपाडा, दावडी, रिजन्सी अनंतम् गेट, टाटा पॉवर, सूचक नाका, पत्री पूल, बैल बाजार, कल्याण स्टेशन परिसर या भागात सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत दहावी, तर १० फेब्रुवारी ते ११ मार्च रोजी बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या कालावधीमध्ये मेट्रोचे काम बंद ठेवावे, जेणेकरून विद्यार्थी वेळेत परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहोचतील. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालक इतर वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. असेही मेट्रो सारखे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मेट्रो प्रकल्पाला विलंब, कल्याण-डोम्बिवलीमध्ये वाहतूक कोंडी; परीक्षा लांबणीवर | Achira News