ईशान्य भारतातील दोन जातींच्या हिंसाचारात गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या मणिपूर राज्याला नवीन नेतृत्व मिळाले आहे. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या भाजप आमदारांनी गटनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीसोबतच ते आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींनंतर, केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत खेमचंद सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. युमनाम खेमचंद सिंह यांनी यापूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय दांडगा अनुभव आहे. मणिपूरमधील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत भाजपने खेमचंद सिंह यांच्या रूपाने एका अनुभवी नेत्याला संधी दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली असून, पक्षातील सर्व गटांना सोबत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारणे आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांच्यासमोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
मणिपूरला नवे नेतृत्व मिळालेः युमनाम खेमचंद सिंग यांची गट नेते आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.