Achira News Logo
Achira News

मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा

Maharashtra Times
मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा
Full News
Share:

मुंबई -लोकप्रिय अभिनेता मंदार जाधवला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये त्यानं जयदीपची भूमिका साकारलेली. ही मालिका बंद झाली असली तरी आजही चाहते त्याला जयदीप म्हणूनच ओळखतात. मंदार जाधवने यापूर्वी हिंदी मालिकेतही काम केलंय. अभिनेत्यानं हिंदी मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मंदार जाधवने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.मंदार जाधवनं सांगितला संघर्षमंदार जाधवनं नुकतीच 'सर्व काही' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान मंदारनं त्याला 'अल्लादिन' ही हिंदी मालिका कशी मिळाली, याबद्दल सांगितलंय. मंदार म्हणाला की, 'माझा लहान भाऊ मेघन जाधवसोबत मी ऑडिशनला गेलेलो, त्याला पाठिंबा देण्यासाठी. पण, तिथे मलाच विचारणा झाली. ते म्हणाले की, आम्ही जशा मुलाच्या शोधात आहोत तू तसाच आहेस तू. या मालिकेत काम करशील का? त्यावर मीसुद्धा 'हो मी पण करेन' असं म्हणालो. तिथून माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे माझी पहिली मालिका मिळवण्यासाठी मला स्ट्रगल करावा लागला नाही.'Anupam Kher : मी तुझं काय वाईट केलंय? बंगाल जिंकताच भाजप नेत्यानं काढला अनुपम यांच्या नसलेल्या केसांचा विषय; अभिनेत्याचं चोख उत्तरअभिनेत्यानं दिल्या ७०० ते ८०० ऑडिशनकाम मिळवण्यासाठीच्यासंघर्षाबद्दलबोलताना मंदार जाधव म्हणाला की, 'हो संघर्ष आहे. कलाकार म्हणून काम करणं कठीण असतं. माझी पहिली मालिका संपली तेव्हा मला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. दोन अडीच वर्षे ती मालिका सुरू होती, पण ती मालिका संपल्यानंतर माझा संघर्ष सुरू झाला. जरी मला अभिनेता व्हायचं नव्हतं तरी माझ्या नशिबात ते लिहिलं होतं त्यामुळे ती मालिका करत असताना मला अभिनय आवडतो याची जाणीव झाली. ती मालिका संपली त्यावेळी मी खूप बारीक होतो. त्यामुळे मी जेव्हा ऑडिशनला जायचो तेव्हा तू खूप बारीक आहेस, जरा बॉडी बनव, चांगलं खा आणि हिरोसारखं बन आधी, असं सांगितलं जायचं. तेव्हा मला जाणवलं की, जर तुम्हाला काम मिळवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. मी अजिबात तसा दिसत नव्हतो. मग मी स्वत:वर काम केलं. त्यावेळी मी हिंदीमध्ये जवळपास ७०० ते ८०० ऑडिशन दिल्या आहेत. चार-पाच वर्षे हे सुरू होतं आणि मला बऱ्याचदा नकार मिळाला.'मंदार जाधवने आयुष्यातील खास क्षण केला शेअर'घरी परिस्थिती ठीक-ठाक होती. आम्ही चाळीत वाढलोय, त्याचा मला आनंद आहे. पण, संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या मालिकेनंतर मला दुसरं काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. जिथे जायचो तिथे नकार मिळत होता. तेव्हा मी ठरवलेलं की मी एक चांगलीमालिकाकेली आहे. त्यात छान काम केलंय त्यामुळे आपण या क्षेत्रातच राहायला हवं. आई-बाबांचा पाठिंबा होता, त्यामुळे मी त्यातून बाहेर आलो. बाबासुद्धा अभिनेते, दिग्दर्शक, लेखक असल्यानं त्यांना याची जाणीव होती. त्यामुळे, या क्षेत्रातील संघर्ष त्यांना माहीत होता.' असं मंदारनं शेवटी सांगितलं

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा | Achira News