मध्यपूर्वेतीलइराणआणि अमेरिका-इस्रायल संघर्षाने आता भीषण वळण घेतले आहे.इराणनेकतारमधीलजगातील सर्वात मोठ्या गॅस निर्यात केंद्रांपैकी एक असलेल्या 'रास लफ्फान' एलएनजी प्रकल्पावर मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळेकतारच्यागॅस क्षमतेत १७ टक्क्यांची मोठी घट झाली असून, या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तब्बल ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी धक्कादायक माहिती 'कतार एनर्जी'ने दिली आहे. इराणचा दावा कतारने फेटाळलाइराणने हा हल्ला अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी केल्याचा दावा केला होता. मात्र, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जासिम अल थानी यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. "आमच्या नागरी सुविधांवर झालेले हे हल्ले कोणत्याही प्रकारे अमेरिकन हिताशी संबंधित नाहीत. इराणचे दावे धादांत खोटे असून ते आम्हाला मान्य नाहीत," अशा कडक शब्दांत त्यांनी इराणला सुनावले आहे. जगावर गॅस टंचाईचे सावट?कतार एनर्जीच्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे देशाला दरवर्षी सुमारे २० अब्ज डॉलर्सचा (१.६ लाख कोटी रुपये) महसूल गमवावा लागणार आहे. कतार आता अनेक देशांसोबतच्या करारांबाबत 'फोर्स मेज्योर' घोषित करणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कडाडण्याची शक्यता असून ऊर्जा संकट गडद होऊ शकते. इराणविरोधात युरोपियन युनियन आक्रमकइराणच्या या 'अंधाधुंद' लष्करी कारवायांचा युरोपियन कौन्सिलने तीव्र निषेध केला आहे. युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेत एक विशेष ठराव मंजूर करण्यात आला असून, नागरी पाणीपुरवठा आणि ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युरोपियन युनियनने या संकटात कतार आणि बाधित देशांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मध्यपूर्वेतील तणाव वाढलाः कतारच्या एल. एन. जी. प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.