Achira News Logo
Achira News

मान तालुक्यातील सकारात्मक बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप नेत्याचा भर

Pudhari
मान तालुक्यातील सकारात्मक बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप नेत्याचा भर
Full News
Share:

माण तालुक्यातील कुकुडवाड गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले, आपल्या माण-खटाव मतदारसंघातील आपले आमदार आज राज्यात मंत्री म्हणून काम करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा मजबूत होण्यापासून पाणीयोजनांची हजारो कोटींची कामे मार्गी लागत आहेत. ग्रीन कॉरिडॉर एमआयडीसी, शक्तीपीठ महामार्गासारखी कधी स्वप्नात आली नाहीत अशी कामे साकारणार असल्याने जनतेचा आमच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. इतकी चांगली कामे होत असताना आपण विरोध करणे योग्य नाही, अशा भावना अनेकांच्या आहेत. त्या भावनेतूनच भाजपकडे येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. भाजपमध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जात आहे. सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले जात आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मान तालुक्यातील सकारात्मक बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप नेत्याचा भर | Achira News