मुंबई:महाराष्ट्रात जानेवारी महिन्याच्या अखेरीसच थंडी कमी होऊ लागली होती. फेब्रुवारीच्या सुरूवातीला तर अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण आता येत्या काही दिवसांत मुंबईसह परिसरातील भागांत उष्णतेची लाट जाणवणार आहे. उद्या मुंबई उपनगरातील अनेक भागांत 2026ची पहिली उष्णनतेची लाट अनुभवायला मिळणार आहे.आज सकाळपासूनमुंबईसह उपनगरातवातावरणात थंडीची तीव्रता कमी झालेली जाणवू लागली आहे. पहाटे काही ठिकाणी धुकं दाटलेलं सुद्धा दिसून आलं होतं. परंतु, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर शहरात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच, आज किमान तापमान 23 अंश सेल्सियस असून, कमाल 32 अंश सेल्सियस असेल. हिवाळ्याच्या सुरूवातीपासूनच शहरात हवेची गुणवत्ता ढासाळली आहे. गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदुषणाच्या पातळीत चढ-उतार होत असून, स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.Mumbai Local: लोकल तिकिट काढणं होणार अधिक सुलभ, रेल्वे स्थानकांवर 325 नवे ATVM बसवणार; कुठे-कसा होणार फायदा?सर्वाधिक फटका कुठे?पण उद्यापासूनकिमान तापमानातआणखी घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उद्या, म्हणजेच 4 फेब्रुवारीचा दिवस, 2026मधील सर्वाधिक उष्ण दिवस ठरणार आहे. मुंबईतील वांद्रे, अंधेरी, जुहू, वर्सोवा आणि पश्चिम मुंबईत उद्या 2026मधील पहिली उष्णतेची लाट अनुभवायला मिळणार आहे. सांताकृझमध्ये तर तापमान 34 अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत दुपारी तापमान 29-30 अंश सेल्सियस पर्यंत राहणार असून, रहिवाशांना उष्णतेचा इतका त्रास सहन करावा लागणार नाही.Mumbai News: मुंबईकरांनो, आता रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं पडणार महागात; महापालिका आकारणार 25 हजारांपर्यंत दंड, कशासाठी किती दंड?मुंबईतील पश्चिम आणि मध्य उपनगरातील तापमानात सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता असून, रहिवाशांना 4 फेब्रुवारीला दुपारच्या वेळेत आवश्यकता नसल्यास बाहेर पडणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या उकाड्यामुळे हवेची गुणवत्ता सुद्धा स्थिर होण्याचे संकेत आहेत.काही जिल्ह्यांत पाऊसमराठवाड्यातील काही जिल्ह्यांना काल हवामान विभागाकडूनयलो अलर्ट जारीकेला असून या भागांत येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, मुंबईसह नवी मुंबई, पुणे, पालघर जिल्ह्यातील हवामान कोरडं राहणार आहे.
मुंबई 2026 च्या पहिल्या उष्णतेच्या लाटेसाठी सज्ज, थंडीची लाट ओसरली
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.