मुंबई :मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला अखेर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला. रोहितने प्रभावशाली कामगिरी करताना ८४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सचा ८ चेंडू आणि ६ विकेट राखून सहज पराभव केला. या विजयामुळे 'मुंबई'च्या प्लेऑफच्या धूसर आशा कायम राहिल्या. या पराभवामुळे 'लखनऊ'च्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने या सामन्यामध्ये 3 नो बॉल टाकले असून आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. याचाच धागा पकडत सुनील गावसकर यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे.सुनील गावसकर काय म्हणाले?मला पुन्हा नका बोलू, नका बोलू की बुमराहने नो बॉल टाकला आहे. कारण हे मान्यच करू शकत नाही. कारण तुम्ही एक प्रोफेशनल क्रिकेटर आहात, त्याच्यामुळे हे कधीच स्वीकारलं जाणार नाही. एकवेळ वाईड बॉल चालेल मी समजू शकतो पण नो बॉल अजिबातच नाही, असंसुनील गावसकरयांनी म्हटलं आहे. बुमराहने ज्यावेळी नॉ बॉल टाकला होता. त्यावेळी त्याला विकेट मिळाली होती. यादरम्यानच कॉमेन्ट्री करताना गावसकरांनी संताप व्यक्त केला. बुमराहने ४ ओव्हरमध्ये ४५ धावा खर्च केल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.MI vs LSG : रोहित आणि रिकल्टन खेळलेच पण मुंबईने खरी मॅच कुठे फिरवली? कॅप्टन ऋषभ पंतने सांगितला टर्निंग पॉइंटसामन्याचा धावता आढावावानखेडे स्टेडियमवरील वाढत्या उकाड्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 'मुंबई'ला काहीसा भोवला. जोस इंग्लिस त्याच्या या मोसमातील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. मात्र, मिचेल मार्श आणि निकोलस पूरनचे धावांचे तुफान 'मुंबई'त धडकले. मात्र, हे दोघे परतल्यावर धावगती आक्रसली. पहिल्या सहा षटकांत ८ चौकार आणि सात षटकार फटकावणाऱ्या 'लखनी' ला त्यानंतरच्या नऊ षटकांत केवळ एक चौकार आणि सहा षटकारच मारता आले. अखेरच्या पाच षटकांत तर केवळ ५३ धावाच होऊ शकल्या.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखपॉवरप्लेमध्ये 'लखनी'ने १ बाद १० धावा केल्या होत्या. पूरनने षटकारांची माळ लावल्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला काय करावे हेच कळत नव्हते. अखेर बॉशने पूरन आणि मार्शला एकाच षटकात बाद केले. या जोडीने ३५ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी रचली. याच षटकात रिषभ पंत बाद होताना वाचला. मात्र, त्यानंतर पंत आणि 'लखनौ'च्या मधल्या फळीतील फलंदाजांना काहीच करता येत नव्हते. त्यामुळे 'लखनौ'चा डाव ८.१ षटकांत १ बाद १२३वरून १२.१ षटकांत ५ बाद १६० असा घसरला होता. हिंमतसिंग दोन धावांवर असताना झेलबाद झाला होता. मात्र, जसप्रीत बुमराहचा तो नो-बॉल ठरला. याच हिंमतने मार्करमसह ४९ चेंडूंत ६८ धावा जोडल्या आणि 'लखनौ'ने आश्वासक धावसंख्या उभारली. 'मुंबई'च्या गोलंदाजांनी डावाच्या उत्तरार्धात चांगला मारा केला. त्यामुळे 'लखनौ'ने मोठी धावसंख्येची संधी गमावली.
मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय, रोहित शर्मा चमकला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.