म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई :मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल टी-२० मध्येही आत्तापर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यामागील काही कारणांवर या संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी लक्ष वेधले. ‘पॉवरप्ले, मधल्या तसेच अखेरच्या षटकांमध्ये आम्ही सातत्यपूर्ण क्रिकेट खेळू शकलो नाही, यामुळे सामने गमावले’, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या खेळाडूंची कानउघाडणी केली.आज, शनिवारी रंगणाऱ्याचेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याआधीचिदंबरम स्टेडियमवरील पत्रकार परिषदेत त्यांनी ही टिप्पणी केली. ‘आम्ही काही टप्प्यांत चांगले क्रिकेट खेळलो. सातत्याचा अभाव दिसत आहे. काही संघ खूप सातत्यपूर्ण खेळत झोकून देत कामगिरी करत आहेत. आम्ही त्या तुलनेत मागे आहोत. कुणा एकावर अपयशाचे खापर फोडणे मला पटत नाही’, याकडे जयवर्धने यांनी लक्ष वेधले.आता प्रत्येक लढत बाद फेरीसारखी‘मुंबई’ला अजूनही बाद फेरीची संधी आहे, असे जयवर्धने विश्वासाने सांगतात. मात्र त्यासाठी पुढील प्रत्येक लढतीत बाद फेरीची अखेरची संधी आहे, असे समजूनच उतरावे लागेल. ‘याआधीही आम्ही सहा सामने सलग जिंकून बाद फेरीत धडक मारली आहे. इतर संघ कसे खेळत आहेत यावरही बरेच काही अवलंबून आहे’, असेही जयवर्धने म्हणाले.RR vs DC: अखेर दिल्लीचं कमबॅक झालंच; एका गोष्टीमुळे राजस्थानविरुद्ध मॅच जिंकता आली; गुणतालिकेत मोठे बदल२० खेळाडू आजमावले!यंदाच्या मोसमात ‘मुंबई’नेवीस खेळाडूंना संधीदिली आहे. हे असामान्य नाही का, या प्रश्नावर जयवर्धने म्हणतात : ‘हो, बरोबरच आहे. एरवीही आम्ही जास्तीत जास्त १६ किंवा १७ खेळाडूंना संधी देतो’.रोहितबाबत अनिश्चितता कायम‘सामन्यासाठी आवश्यक असणारा फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी रोहित खूप परिश्रम घेत आहे. आमचे वैद्यकीय पथकही त्याची नियमित तपासणी करत आहे. शुक्रवारीही रोहितने सराव केला. शनिवारी सामन्याआधी रोहितला कसे वाटते आहे, डॉक्टरांचे काय म्हणणे आहे, ते ऐकूनच रोहितच्या समावेशाचा निर्णय होईल’, असे पठडीतील उत्तर जयवर्धने यांनी पुन्हा दिले.Muttiah Muralitharan : स्पिन गोलंदाजीची कला लोप पावतेय, चेंडू वळवण्यास शिकवलेच जात नाही'; मुथय्या मुरलीधरन याचे मोठे विधानजयवर्धने म्हणतात...- खेळाडू सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात, पण आवश्यक ती अंमलबजावणी होत नाही- सबब देत नाही; पण दुखापती आणिखेळाडूंच्या उपलब्धतेमुळेआम्हाला सतत बदल करावे लागले- यामुळे भूमिका निश्चित होत नाहीत, पण कामगिरीतील सातत्याचा अभाव नक्कीच मान्य आहेसूर्याच्या अपयशाबद्दल...- सरावात आणि सामन्यांतही तो चांगली फटकेबाजी करतो, पण काही वेळा दुर्दैवाने बाद होतो- कधी सीमारेषेवर झेल जातो. तर काही वेळा चांगल्या चेंडूवर सूर्या बाद झाला आहे- मी फलंदाज होतो, त्यामुळे सूर्याची परिस्थिती समजू शकतो- सूर्याने आमच्यासाठी तीन-चार वर्षे सर्वोत्तम कामगिरी केली आहे- कधी कधी थोड्या कठीण काळातून जावे लागते. सूर्या प्रतिकूलतेतही हसत मैदानात उतरतो हे विशेष
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने खराब कामगिरीसाठी विसंगतीला जबाबदार धरले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.