अमुलकुमार जैन, पुणे (लोणावळा): मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर काल मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने एकच खळबळ उडवून दिली. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. परिणामी द्रुतगती मार्गावर भीतीचं वातावरण पसरले असून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक 15 तासांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे.टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटीपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटीझाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही अपघात किंवा ठिणगी मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडाया घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुणे मार्गिकेवरील एका लेनवरून रात्री बारानंतर मर्यादित स्वरूपात वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे अनेक तास अडकून पडलेल्या वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.टँकर हटविणे धोकादायकमात्र, अपघातानंतर अनेक तास उलटूनहीगॅस गळती रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. तज्ञ पथक गळती थांबविण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अपघातग्रस्त टँकर हटविणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. बोरघाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असून दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.Sharad Pawar: शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांवर संतापले, त्यांना माझा उल्लेख करण्याचा...; विलीनीकरणावरही भूमिका जाहीरमुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटून वाहतूक 15 तास ठप्प
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.