Achira News Logo
Achira News

मुंबई महापौर निवडणूकः वादाच्या भोवऱ्यात लोकशाहीची परीक्षा

Maharashtra Times
मुंबई महापौर निवडणूकः वादाच्या भोवऱ्यात लोकशाहीची परीक्षा
Full News
Share:

मुंबई :मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक पार पडून आता 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीही महापौर पदासाठी निवडणूक कधी पार पडेल? याबाबत माहिती समोर येत नव्हती. विविध कारणास्तव महापौर पदाची निवडणूक पुढे सरकत होती. मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. पण दोन्ही पक्षांच्या गटाची नोंद ही उशिरा झाल्याने या निवडणुकीला विलंब झाला असं बोललं जात होतं. राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाली आहे. पण मुंबईच्या महापौर पदाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुंबई महापालिकेचं महापौर पद हे खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचं जाहीर झालं होतं. यानंतर भाजप की शिवसेना शिंदे गटाचा महापौर होईल? याबाबत साशंकता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवल्याने त्यांचा महापौर पदावर प्रबळ दावा असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण भाजपने आपला दावा सोडला नाही आणि शिंदे बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. आता महापौर हाभाजपचाचहोईल हे निश्चित असल्याची चर्चा आहे. यासाठी काही नावांची चर्चा आहे. या दरम्यान मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ठरला?मुंबईच्यामहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरल्याचं वृत्त 'टीव्ही 9 मराठी'ने दिलं आहे. येत्या 7 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यानंतर 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेत दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभागृह भरण्याच्या 15 मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. या विशेष सभेत महापौर पदाची निवड केली जाईल आणि नव्या महापौराची घोषणा करण्यात येईल.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मुंबई महापौर निवडणूकः वादाच्या भोवऱ्यात लोकशाहीची परीक्षा | Achira News