मुंबई या शहराला स्वप्नांची नगरी म्हणतात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. दररोज कोट्यवधींचे व्यवहार मुंबईत होतात. जगभरातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयं मुंबईत आहेत. आज मुंबई हे शहर जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण लक्षवेधी बाब म्हणजे, एक वेळ अशीही होती जेव्हा मुंबई हे एक छोटंसं गाव होतं. भारतात इंग्रज आले आणि त्यांचं लक्ष या छोट्याशा गावावर पडलं. आणि पाहता पाहता एका लहानशा बेटाचं रूपांतर भल्यामोठ्या, संपन्न शहरात झालं. चला पाहूया १८व्या शतकात कशी बदलत गेली मुंबई. हा AI व्हिडिओ पाहून तुम्हीही दंग व्हाल.(फोटो सौजन्य - kaalchakra.bharat/Instagram)मुंबईची निर्मिती कशी झाली?View this post on InstagramA post shared by Kaalchakra.Bharat (@kaalchakra.bharat)हे व्हिडिओ kaalchakra.bharat या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ AI सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये तुम्ही मुंबईचा इतिहास पाहू शकता. गंमत म्हणजे हे व्हिडिओ इतक्या प्रभावी पद्धतीने तयार केले आहेत की पाहताना जणू २०० वर्षांपूर्वीच्या काळात गेल्यासारखं वाटतं. कोळी लोकं मासेमारी कशी करायचे, पहिली रेल्वे कशी सुरू झाली, पहिला स्टॉक एक्स्चेंज कसा होता, मुंबई ही सात बेटांची बनलेली आहे पण २००-३०० वर्षांपूर्वी ही बेटं कशी होती, यांसारख्या अनेक रंजक गोष्टी या व्हायरल व्हिडिओंमध्ये पाहायला मिळतात.कशी झाली स्टॉक एक्सेंजची निर्मिती?View this post on InstagramA post shared by Kaalchakra.Bharat (@kaalchakra.bharat)हे व्हिडिओ १ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. अनेकांनी या व्हिडिओंचं कौतुकही केलं आहे. कारण मुंबईबद्दल बरीच माहिती सर्वश्रुत आहे. तिच्या इतिहासावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, पण तीच माहिती या व्हिडिओंमध्ये दृश्य स्वरूपात पाहायला मिळते. त्यामुळे हे व्हिडिओ अधिक प्रभावी वाटतात आणि २००-३०० वर्षांपूर्वीच्या काळात गेल्याचा अनुभव देतात.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
मुंबईची उत्क्रांतीः छोट्या गावापासून जागतिक केंद्रापर्यंत
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.