मुंबई :भायखळा येथीलवीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानआणि प्राणिसंग्रहालयातील महापौर बंगल्यात नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी अद्याप प्रवेश केलेला नाही. नव्या महापौर येण्याआधीच या बंगल्याची बाह्य आणि अंतर्गत दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. मात्र, आता महापौरांच्या सूचनेनुसार पुन्हा अंतर्गत दुरुस्ती व सजावटीची कामे केली जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने एक कोटी ४८ लाख ११ हजार रुपयांची निविदा जारी केली आहे.दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. त्यामुळे २०१९मध्ये महापौर राहिलेले विश्वनाथ महाडेश्वर यांना हा बंगला सोडावा लागला होता. त्यांनी भायखळ्याच्या राणी बागेतील महापौर बंगल्यात प्रवेश केला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांचे वास्तव्यही याच बंगल्यात होते. त्यानंतर प्रशासक काळ होता.Unseasonal Rain: राज्यात अवकाळी, गारपिटीचा मारा; नाशिक, मराठवाड्यात पिकांचे नुकसान, पुण्यातही हजेरीप्रशासक काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली, तर काही लाकडी फर्निचरचीही दुरवस्था झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधीच या बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी निविदा काढून कंत्राटदार नेमण्यात आला. संरचनात्मक दुरुस्ती, कौलांच्या आधारलाकडाची दुरुस्ती, पेंटिंग व पॉलिशिंगची कामे, वाळवीप्रतिरोधक कामांसह अन्य कामे या कंत्राटदारांकडून करण्यात आली. मात्र, नव्या महापौरांनी बंगल्याची पाहणी केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार आता अंतर्गत सजावटीसह अन्य दुरुस्त्या केल्या जाणार आहेत.सध्यामहापौर तावडेया घाटकोपर पश्चिमेला टेलिफोन एक्स्चेंज लेन येथील एका इमारतीत राहतात. महापौर निवासस्थान ही महापालिकेची मालमत्ता असून, त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे निर्णय संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियमित प्रक्रियेनुसारच घेतले जात असल्याचे महापौर कार्यालयाकडून याआधी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, महापौर बंगल्याची डागडुजी आधीच झालेली असतानाच पुन्हा दुरुस्ती केली जणार असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.Raj Thackeray: इराणवरील हल्ल्यांचा साधा निषेधही नाही! राज ठाकरेंची परराष्ट्र धोरणावर सडकून टीकामहापौरांचा प्रवेश लांबणारनव्या महापौरांच्या सूचनेनुसार महापौर बंगल्यात अंतर्गत सजावटीसह अन्य दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. ही निविदा भरण्याची अंतिम तारीख २७मार्च आहे. निविदाप्रक्रिया राबवून कार्यादेश दिल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळेमहापौरांचा बंगल्यातील प्रवेशआणखी लांबणार आहे.
मुंबईचे नवनिर्वाचित महापौर नूतनीकरण केलेल्या बंगल्यात जाणार, स्मारक बांधण्याचे नियोजन
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.